गणेशविसर्जनाला परवानगी दिली जाते, मग मोहरमला का नाही? राज्य सरकारला निर्णय घेण्याचे न्यायालयाचे आदेश

गणेशविसर्जनाला परवानगी दिली जाते, मग मोहरमला का नाही? राज्य सरकारला निर्णय घेण्याचे न्यायालयाचे आदेश
Updated on

मुंबई : येत्या मोहरमच्या निमित्ताने सार्वजनिक प्रतिकात्मक मिरवणूक काढण्याबाबत राज्य सरकारने शिया मुस्लिम  संस्थेची बाजू ऐकून निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले. दरम्यान, मोहरम मिरवणुकीला परवानगी दिली आणि त्यानंतर कोरोना रुग्णांची वाढ झाली तर कोरोना पसरविण्याबाबत एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य केले जाऊ शकते, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने आज व्यक्त केले.

मोहरमनिमित्त ता. 27 ते 30 या दरम्यान प्रतिकात्मक मिरवणूक काढण्यासाठी ऑल इंडिया इदारा ए तहफूज ए हुसैनियत या संस्थेने न्यायालयात याचिका केली आहे. कोव्हिड19 च्या पाश्वभूमीवर राज्य सरकारने मोहरमबाबत नुकतीच नियमावली जाहीर केली आहे. यानुसार सार्वजनिक मिरवणुकीला मनाई करण्यात आली आहे. तसेच घरामध्ये सर्व विधी करण्यास सांगण्यात आले आहे. या नियमांना याचिकेत विरोध करण्यात आला आहे. 

जर गणपती उत्सवामध्ये विसर्जन करण्यासाठी सुरक्षित तत्वे पाळून परवानगी दिली जाते तर मोहरम मध्ये का नाही, असा सवाल याचिकेत उपस्थित केला आहे. न्या एस जे काथावाला आणि न्या एन एम जामदार यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर नुकतीच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. खंडपीठाने सरकारला याचिकेत उपस्थित मुद्यांवर संस्थेची बाजू ऐकण्याचे निर्देश दिले आहेत. जर गणपती उत्सवमध्ये दिलेल्या सवलतीनुसार याचिकादार मोहरमसाठी काही मागणी केली असेल तर त्यावर सरकारकडून विचार व्हायला हवा, असे मत खंडपीठाने व्यक्त केले.

याचिकादार दरवर्षी सातव्या आणि दहाव्या दिवशी मोहम्मद अली रोड ते रे रोडपर्यंत मिरवणूक काढली जाते. ही जुनी परंपरा आहे असे याचिकादारांकडून एड राजेंद्र शिरोडकर यांनी सांगितले. मात्र मिरवणूक मध्ये जास्त संख्येला परवानगी दिली जात नाही, असे सरकारी वकील पूर्णिमा कंथारिया यांनी सांगितले. परंतु मर्यादित संख्या आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून प्रतिकात्मक विधीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी शिरोडकर यांनी केली. राज्य सरकारने आपला निर्णय शुक्रवारी न्यायालयात कळवावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मोहरम मिरवणूक संबंधित याचिका नामंजूर केली. उत्तर प्रदेश मधील नागरिक सय्यद जवाद यांनी देशभरात मिरवणुकांना परवानगी मिळावी, अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र अशी परवानगी दिली आणि कोरोना संसर्ग वाढला तर एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य केले जाईल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com