Ganeshotsav 2022: 'वर्षा'वर बाप्पाचं आगमन; मुख्यमंत्री शिंदेंची सहकुटुंब पूजा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav with CM Eknath Shinde

Ganeshotsav 2022: 'वर्षा'वर बाप्पाचं आगमन; मुख्यमंत्री शिंदेंची सहकुटुंब पूजा

राज्यभरात आजपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यानिमित्ताने राज्यात उत्साहाचं वातावरण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानीही गणरायाचं उत्साहात आगमन झालं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब बाप्पाची पूजा करत प्रतिष्ठापना केली आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे, पुत्र खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांची सून आणि त्यांचा नातू रुद्रांश हे देखील सहभागी झाले होते.

मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातल्या नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच सर्वांनी एकजुटीने राज्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचं आवाहन केलं आहे.

आपल्या संदेशात मुख्यमंत्री शिंदे म्हणतात,"महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा. महाराष्ट्रातल्या घराघरांत गणरायाचं आगमन होतंय."

"त्याच्या कृपेने दोन वर्षांपासून असलेलं कोरोनाचं संकट अखेर दूर झालं. त्यामुळे यंदा आपण गणरायाचं उत्साहात, जल्लोषात आणि निर्बंधमुक्त वातावरणात स्वागत करत आहोत."

" गणेशाचं हे आगमन आपल्या सर्वांच्या आयुष्यात  सुखसमृद्धी आणि समाधान घेऊन येवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. "

"गणरायाचा उत्सव करताना राज्याच्या विकासाचा पुनश्च: श्रीगणेशा करण्याचा आपण संकल्प करुया."

" आपण सर्व एकजुटीने कोणत्याही आव्हानाची पर्वा न करता प्रयत्न करूया. उत्सव साजरा करताना सामाजिक भान जपणंही आवश्यक आहे."

" आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यावर सार्वजनिक गणेश मंडळांनी भर देऊन जागृती करण्याचं आवाहन मी सर्व गणेशभक्तांना करत आहे."

" आपल्या सर्वांच्या साक्षीने महाराष्ट्राच्या विकासाचा दृढसंकल्प आपण केला आहे. त्यासाठी आपल्या मनातलं सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असं मी आश्वासन देतो."

" आपली साथ आम्हाला हवी आहे. कोरोना संकटामुळे मंदावलेली विकासाची गती आपल्याला पुन्हा गाठायची आहे. त्यासाठी कितीही आव्हानं आली तरी त्याची तमा बाळगायची नाही."

" महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्चः श्रीगणेशा करण्याचा संकल्प पूर्णत्वास जावा, असं साकडं मी गणरायाला घालत आहे. "

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातल्या नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी सर्व नागरिकांनी सामाजिक भान राखत उत्सव साजरा करण्याचं आवाहनही केलं आहे.

Web Title: Ganeshotsav 2022 Cm Eknath Shinde Welcomes Ganpati Bappa On Ganesh Chaturthi At Varsha Government House Of Cm Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..