मुंबई - 'गणपती बाप्पा मोरया!' च्या जयघोषात अवघं मुंबईकरांचं मन रंगून जाणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी बेस्ट उपक्रमाने यंदा खास तयारी केली आहे. दिवसरात्र गणेशभक्तांना सुरळीत सेवा मिळावी, विसर्जनावेळी कुठेही अंधार किंवा गैरसोय होऊ नये यासाठी वीज व वाहतूक विभागाने भक्कम नियोजन आखले आहे.