गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवा : जिल्हाधिकारी

अधिकाऱ्यांना सुचना देताना जिल्हाधिकारी डाॅ. विजय सूर्यवंशी
अधिकाऱ्यांना सुचना देताना जिल्हाधिकारी डाॅ. विजय सूर्यवंशी


मुंबई : कोकणात गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान कोकणवासीयांचा प्रवास सुखकर व सुरळीत व्हावा, याकरिता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही गणेशोत्सवापूर्वी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीबाबत आढावा बैठकीत ते अधिकाऱ्यांशी बोलत होते. 

या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, उपविभागीय अधिकारी पेण प्रतिमा पुदलवाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, राष्ट्रीय महामार्ग पनवेल प्रबंधक अभिषेक अग्रवाल, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग पेण रत्नाकर बामणे, शाखा अभियंता, रा. म. विभाग पेण रुपेश सिंगासने, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पेण संजय उदावत, प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे, वाहतूक पोलिस विभागाचे सुरेश वार्डे तसेच विविध सरकारी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

या वेळी डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, की गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविले जावेत. पोलिस विभागाने गणेशोत्सव काळात महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे होईल असे पहावे. महामार्गाच्या कामात विविध तंत्रज्ञानाचा तसेच जादा मनुष्यबळाचा वापर करून रस्त्यावरील खड्डे बुजविणे, पेव्हरब्लॉक बसविण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी या वेळी अधिकाऱ्यांना दिले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com