'लालबागच्या राजा'चा गणेशोत्सव रद्द, मंडळ जपणार सामाजिक भान 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता यावर्षी गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय मंडळाने घेतला.

मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर 'लालबागचा राजा' सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणपती उत्सव साजरा न करण्याचा अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. सामाजिक भान जपत यंदा आरोग्यउत्सव साजरा करण्याचे   मंडळाने ठरवले आहे.

हे ही वाचा : खाकी वर्दीची तत्परता ! एक ट्विट अन् 'त्या' व्यक्तीच्या मदतीसाठी पोलिस धावून गेले

'लालबागच्या राजा' मंडळाने  उत्सवच साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी राजाच्या मंडपात गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थदशीपर्यत रक्तदान व प्लाझ्मा दानाची शिबिरे घेतली जातील, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे 'लालबागचा राजा' यंदा आरोग्य उत्सवातून गणेशोत्सव साजरा करणार आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे 87 वे वर्ष आहे.

नक्की वाचा : मुंबईतीलं सलून सुरु झाले खरे, पण छोट्या व्यावसायिकांना भेडसावतोय हा प्रश्न...

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच राज्यातील गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींसोबत बैठकाही घेतल्या होत्या. या बैठकींमध्ये उत्सव नेमका कसा साजरा करायचा, मूर्तीची उंची किती असावी, सोशल डिस्टन्सिंगचे पालन कसे करावे, या संदर्भात चर्चा झाली होती व मंडळांना याबाबतचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार अनेक मंडळांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करून उत्सवात बदल करण्याचे निर्णय घेतले होते. त्याप्रमाणे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता यावर्षी गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय मंडळाने घेतला. यावर्षी लालबागच्या राजाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार नाही केवळ आरोग्यउत्सव होईल, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.

Ganeshotsav of Lalbaugcha raja canceled, Mandal will take care of social consciousness


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav of Lalbaugcha raja canceled, Mandal will take care of social consciousness