esakal | खाकी वर्दीची तत्परता ! एक ट्विट अन् 'त्या' व्यक्तीच्या मदतीसाठी पोलिस धावून गेले
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra police

खाकी वर्दीतही माणूसकीचा झरा असतो, हे कोरोना महामारीत पोलिस कर्मचाऱ्यांनी दाखवून दिले आहे.

खाकी वर्दीची तत्परता ! एक ट्विट अन् 'त्या' व्यक्तीच्या मदतीसाठी पोलिस धावून गेले

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चेंबूर : खाकी वर्दीतही माणूसकीचा झरा असतो, हे कोरोना महामारीत पोलिस कर्मचाऱ्यांनी दाखवून दिले आहे. टिळकनगर रेल्वे स्थानक जवळील पुलाखाली एक अनोळखी आजारी वृद्धास टिळकनगर पोलिसांनी रुग्णालयात दाखल करत माणूसकीचे दर्शन दाखविले. 

नक्की वाचा : शेवटी जे नको व्हायला हवं होतं ते झालंच, ज्यांनी केला कामाठीपुरा कोरोनमुक्त शेवटी त्यांनाच...

हा अनोळखी वृध्द गेली कित्येक दिवसापासून आजारी असल्याने एका जागेवर पडून होता. तो आपल्या सर्व प्रात: विधी जागेवरच करीत असल्याने त्यांच्या अंगाची दुर्गंधी येत होती. तो काही खात नसल्यामुळे त्याची प्रकृती पूर्ण खालावली होती. त्याला काही नागरिक खायला आणून देत होते परंतु त्याला दिलेला खाऊ ती तसाच ठेवून द्यायचा. याबाबत जागरूक नागरिक इम्युनल राजन नाडर यांनी पोलीस आयुक्तांना ट्विट केले. त्यांनी त्वरित दखल घेऊन टिळक नगर ठाण्याला संपर्क करून घटना स्थळी जाण्यास सांगितले.

महत्वाची बातमीबापरे! मुंबईत एन- 95 मास्कचा काळाबाजार; झेरॉक्स दुकानात जास्त किंमतीने मास्कची विक्री..

त्यानंतर तत्काळ पोलिस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलिस हेड कॉन्स्टेबल राजू यादव, पोलिस नाईक बबन गावित, पोलिस शिपाई नामदेव कारंडे यांनी पुलाखालील अनोळखी वृद्ध व्यक्तीचा शोध घेत आंघोळ घालून त्याची स्वच्छता केली. त्यानंतर त्या वृध्द व्यक्तीला चांगले कपडे घालून उपचाराकरिता राजावाडी रुग्णालयात दाखल केले.

A tweet and the police rushed to the help for the person read full story