मुंबईतीलं सलून सुरु झाले खरे, पण छोट्या व्यावसायिकांना भेडसावतोय हा प्रश्न...

salon
salon

मुंबई : तब्बल तीन महिन्यानंतर मंगळवारपासून मुंबईत सलून सुरू झाले. तीन महिने सलून बंद राहिल्यानं पहिल्या दिवशी अनेक ठिकाणी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. राज्य सरकारनं दिलेल्या नियमांचे पालन करत ग्राहकांचे थर्मल स्कॅनिंग करूनच त्यांना सलूनमध्ये प्रवेश दिला जात आहे. राज्य सरकारनं आखून दिलेल्या नियमावलीत सलून, ब्युटी पार्लरचे मालक नव्या उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण गेल्या तीन महिन्यांपासून सलून आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळेच दुकानं सुरु झाल्यानंतर मालकवर्ग चांगला व्यवसाय होण्याची अपेक्षा करताहेत. मात्र मुंबईतील काही छोट्या सलून मालकांनी आपली खंत बोलून दाखवली आहे. 

थेट सलूनला भेट देणारी व्यक्ती आता तशी भेट देऊ शकत नाही आहे. प्रत्येक  ग्राहकाला सलूनच्या ब्रँडनुसार ऑनलाईन किंवा फोन करुन अपॉईंटमेंट घ्यावी लागत आहे. एनिच सलूनचे संस्थापक विक्रम भट यांनी सांगितले, ग्राहक आमच्या कॉल सेंटरमध्ये कॉल करू शकतात. तसंच आमच्या साइटवर जाऊन किंवा आमच्या अॅपद्वारे सोयीस्कर जागा आणि एक्स्पर्टसाठी अपॉईंटमेंट बुक करु शकतात. सोशल डिस्टन्सिंगच्या उद्देशाने आम्ही ग्राहकांना विनंती करतो की त्यांनी आधीची अपॉईंटमेंट घ्यावी. आम्ही केवळ 50 टक्के कर्मचार्‍यांसह काम करीत आहोत. सध्या, आम्ही सलून आठवड्यातून सात दिवस खुले ठेवण्याची योजनाही आखली आहे.

गेल्या तीन महिन्यांतील व्यवसायाविषयी बोलताना भट म्हणाले, आम्ही लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना स्वतः पार्लर करण्याचं सेशन, वेबिनार अशी सेवा दिली आणि या माध्यमाद्वारे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

जुहू येथे मुंबई शाखा असलेल्या गीतांजली सलोन आणि स्टुडिओचे व्यवस्थापकीय संचालक सुमित इसरानी म्हणाले, आमच्या एसओपीमध्ये सेवा देण्याच्या आधी नंतर संपूर्ण सलूनची स्वच्छता, मर्यादित नेमणुका, तापमान तपासणं, त्यासोबत ग्राहक आणि कर्मचार्‍यांसाठी डिस्पोजेबल संरक्षणात्मक गियर आणि सॅनिटायझरचा समावेश करण्यात आला आहे.  

दरम्यान काही छोट्या छोट्या सलूनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपली खंत बोलून दाखवली आहे. अमीर सय्यद (नाव बदलले आहे) जो सात बंगला येथे छोट्या सलूनमध्ये काम करतात. गेल्या तीन महिन्यांपासून साठवलेल्या पैशांवर दिवस काढत आहेत. त्यांना दरमहा 15 ते 20 हजार रुपये मिळतात. सलून पुन्हा उघडण्यास परवानगी मिळाल्यामुळे, जुलै नंतर उत्पन्न पुन्हा सुरू होईल असा त्यांचा अंदाज होता, मात्र त्यांच्या सलूनमध्ये केवळ हेअरकट करण्याची परवानगी मिळाल्यानंतर तेथे ग्राहक फारच क्वचित येत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे सलून सुरु झालं असलं तरी व्यवसाय मात्र काहीच नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. 

सय्यद म्हणाले, मला फक्त माझ्या खर्चाची काळजी घ्यायची नसते तर माझं कुटुंब उत्तर प्रदेशमध्ये असतं. मला तिथेही पैसे पाठवावे लागतात. मी पुन्हा काम करण्यास सुरवात केली आहे. मात्र मला वाटत नाही की, जेवढी रक्कम वापरली तेवढी पुन्हा कमवता येईल. ग्राहकांची संख्या खूपच कमी आहे. 

अंधेरी येथील चेतन मेन्स सलूनमध्येही ग्राहक फार कमी येत आहेत. या सलूनमध्ये सर्व कर्मचारी ही पीपीई सूट घालून असतात. नाव न सांगण्याच्या अटीवर एका कर्मचार्‍याने सांगितलं, दाढी करणं, चेहरा मसाज करणं या आणि अशा इतर कोणत्याही कार्यास परवानगी नाही. लोक महिन्यातून एकदा हेअर कटसाठी येत असतात. मग कसा व्यवसाय होऊ शकेल. अशा ठिकाणी चांगला व्यवसाय होणं अशक्य आहे. तसेच, बरेच लोक जोखीम घेऊ इच्छित नाहीत म्हणून ते घरातच राहणे पसंत करतात. आम्ही सरकारने सुचवलेल्या सर्व नियमांचं पालन करत आहोत कारण खबरदारी घेणे आवश्यक आहे.

salons have started in Mumbai, but problem facing small businesses

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com