Ganeshotsav : विमान प्रवासात घ्या पुरणपोळीचा आस्वाद! गणेश चतुर्थी निमित्त विशेष ऑफर

अकासा एअरची ऑनबोर्ड मील सर्विस कॅफे गणेश चतुर्थी निमित्त विशेष ऑफर विमान प्रवाशांना देत आहे.
Akasa Airlines
Akasa Airlinessakal

मुंबई - गणेशोत्सवानिमित्य अकासा एअर लाइन्समधून प्रवास करणारी प्रवाशांना खस्ता कचोरी, पुरण पोळीच्या आस्वाद घेता येणार आहे. अकासा एअरची ऑनबोर्ड मील सर्विस कॅफे गणेश चतुर्थी निमित्त विशेष ऑफर विमान प्रवाशांना देत आहे.

या खास जेवणाच्या ऑफरमध्ये स्वादिष्ट खस्ता कचोरी, मसालेदार रगडा, ताजेतवाने गोड बटाटा चाट, एक अनोखी पुरण पोळी आणि विभिन्न ड्रिंक्स आदिंसह पारंपारिक स्वादिष्ट पदार्थांचा देखिल समावेश असेल.

हे जेवण सप्टेंबर २०२३ मध्ये संपूर्ण अकासा एअर नेटवर्कवर प्रवाश्यांसाठी उपलब्ध असेल आणि अकासा एअरच्या वेबसाइट किंवा मोबाइल अॅपवर सोयीस्करपणे प्रवासी यासाठी प्री-बुकींग देखिल करू शकतील.

ऑगस्ट २०२२ मध्ये ऑपरेशन सुरू झाल्यापासून, अकासा एअर ने खास क्युरेट केलेले जेवणाचे पर्याय सादर केले आहेत जे लोकप्रिय सण आणि दसरा, दिवाळी, ख्रिसमस, मकर संक्रांती, व्हॅलेंटाईन डे, होळी, ईद उल-फितर, मदर्स डे, आंतरराष्ट्रीय योग दिवस, मॉनसून, ओणम इ. यांसारख्या विशेष प्रसंगी उत्सवांशी संबंधित प्रादेशिक वैशिष्ट्यांद्वारे प्रेरित आहेत.

आकाशात आपल्या प्रियजनांचा वाढदिवस साजरा करू इच्छिणाऱ्या प्रवासांसाठी एअरलाइन त्यांच्या नियमित मेनूमध्ये केकची पूर्व-निवड ऑफर सुद्धा देत आहे. जून २०२३ मध्ये सुरू झालेल्या कॅफे अकासाच्या रीफ्रेश मेनूचा एक भाग म्हणून, ग्राहकांना आहार आणि पॅलेटच्या विस्तृत श्रेणीची पूर्तता करणारे आरोग्यदायी, फ्यूजन, उत्सवपूर्ण आणि खमंग जेवणांसह ६० हून अधिक जेवणाचे पर्याय निवडण्याची संधी दिली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com