गणेशोत्सवापूर्वी ठाण्यातील खड्डे बुजवा : एकनाथ शिंदे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 सप्टेंबर 2018

ठाणे : कोणत्याही परिस्थितीत ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजवा, असे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी संबंधित विभागांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाने "कायदा सुव्यवस्था'विषयक आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. 

या वेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्त गोविंद बोडके, भिवंडी-निजामपूर महानगरपलिका आयुक्त मनोहर हिरे, मिरा-भाईंदर पालिका आयुक्त बालाजी खतगावकर, उल्हासनगर पालिका आयुक्त गणेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील उपस्थित होते. 

गणेशोत्सव आणि मोहरम हे दोन्ही सण एकाच कालावधीत येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी पोलिस व इतर यंत्रणांनी घ्यावी. तसेच वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या सणांच्या काळात वीज खंडित होणार नाही, याची पुरेपूर दक्षता घ्यावी. त्याचबरोबर रेल्वे, एसटी सेवा सुरळीत सुरू राहावी, असेही निर्देश पालकमंत्री शिंदे यांनी या वेळी दिले. गणेशोत्सवासाठी साडेतीन हजार पोलिस तैनात असतील, अशी माहिती ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Before Ganeshotsav ready roads says Eknath Shinde