गणेशोत्सवासाठी १६६ विशेष गाड्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची तुफान गर्दी पाहता, मध्य रेल्वेने १६६ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, एलटीटी, दादर, पनवेल, पुणे आदी स्थानकांतून करमाळी, सावंतवाडी, रत्नागिरी व पेरनेम स्थानकांसाठी विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांना २५ मेपासून विशेष गाड्यांचे आरक्षण करता येणार आहे.

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकरिता २५ मेपासून आरक्षण सुविधा
मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची तुफान गर्दी पाहता, मध्य रेल्वेने १६६ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, एलटीटी, दादर, पनवेल, पुणे आदी स्थानकांतून करमाळी, सावंतवाडी, रत्नागिरी व पेरनेम स्थानकांसाठी विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांना २५ मेपासून विशेष गाड्यांचे आरक्षण करता येणार आहे.

मुंबई (सीएसएमटी) ते सावंतवाडी (२६ फेऱ्या) गाडी २८ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरदरम्यान धावणार आहे. मुंबई ते सावंतवाडी (१२ फेऱ्या) अशी दुसरी गाडी २९ ऑगस्ट ते १४ सप्टेंबरदरम्यान आणि मुंबई-पनवेल-रत्नागिरी (२२ फेऱ्या) गाडी २८ ऑगस्ट ते १६ सप्टेंबरदरम्यान धावणार आहे. पनवेल-सावंतवाडी-मुंबई (२२ फेऱ्या), लोकमान्य टिळक टर्मिनस ते पेरनेम (सहा फेऱ्या), लोकमान्य टिळक टर्मिनस ते झाराप (सहा फेऱ्या), लोकमान्य टिळक टर्मिनस-झाराप-पनवेल (आठ फेऱ्या), पनवेल-सावंतवाडी (आठ फेऱ्या), पनवेल-थिविम (आठ फेऱ्या), पुणे-रत्नागिरी (सहा फेऱ्या) व्हाया कर्जत-पनवेल, पुणे-करमाळी (दोन फेऱ्या), पनवेल-सावंतवाडी आदी विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.

Web Title: Ganeshotsav Special Railway for Konkan