मंडळांवर गणेशाचा कृपा‘लाभ’

विरार ः गणेशोत्सवाचे औचित्य साधून राजकीय पक्षांनी मंडळाच्या प्रवेशद्वारावर लावलेले फलक.
विरार ः गणेशोत्सवाचे औचित्य साधून राजकीय पक्षांनी मंडळाच्या प्रवेशद्वारावर लावलेले फलक.

विरार ः गणेशोत्सवाच्या आयत्या चालून आलेल्या संधीचा लाभ घेण्यास पुढे सरसावलेल्या राजकीय पक्षांकडून उत्सवातून नागरिकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे. तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी बॅनर, होर्डिंग्ज झळकवून अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांकडून केला जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षांबरोबरच यंदा गणेशोत्सव मंडळांवरही गणेशाची कृपा झाली आहे. 

विधानसभेची निवडणूक दर पाच वर्षांनी ऐन गणेशोत्सवाच्या काळात येते. त्यामुळे दर पाच वर्षांनी मंडळांना गणपती चांगल्या तऱ्हेने पावत असल्याचे दिसत आहे. निवडणूक झाल्यानंतर या मंडळांना जवळही उभे न करणारे निवडणुकीच्या तोंडावर मात्र मंडळाच्या कार्यकर्त्यांना शोधत असतात आणि त्यांना काय हवे, काय नको, याची आवर्जून विचारपूस करतात.

यंदाही ठिकठिकाणच्या गणेशोत्सव मंडळांना भावी आमदारांनी भरघोस मदत दिल्याचे मंडळाच्या ठिकाणी उभारलेल्या कमानींवरून दिसत आहे. मंडळांना या भावी आमदारांनी १० हजारांपासून एक लाखापर्यंत मदत केल्याचे दिसून येत आहे. सध्या यामध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यात चुरस असून, त्यापाठोपाठ काँग्रेसनेही मंडळांना भरघोस मदत केल्याचे दिसून येत आहे; तर दुसऱ्या बाजूला वसई-विरारमधील सत्ताधारी बहुजन विकास आघाडीही मंडळांना मदत करण्यास पुढे आल्याचे दिसत आहे.

मंडळाच्या कमानीपासून ते मुख्य गेटपर्यंत वेगवेगळे दर मंडळाने आकारले आहेत. त्याचा फायदा मंडळांना होत आहे. कमानीवर एक; तर मुख्य प्रवेशद्वारावर दुसरा, असे सर्वच भावी आमदार या ठिकाणी बॅनरवर विराजमान झाल्याचे चित्र ठिकठिकाणच्या गणेशोत्सवाच्या मंडळात दिसून येत आहे.

निवडणुका आल्या की, सर्वच राजकीय पक्षांना आठवतात ते कार्यकर्ते आणि मोठेमोठी मंडळे. यातूनच मग त्यांना जवळ करण्यासाठी वेगवेगळे उत्सव, कार्यक्रम यांच्या माध्यमांतून मदत करण्याची स्पर्धा राजकीय नेत्यांमध्ये सुरू असते. गेली पाच वर्षे गणेशोत्सव मंडळांकडे न बघणारे आमच्यासारखे राजकीय नेते आता मात्र त्यांना मानाने बोलावून मदत करत आहोत. 
रोहित सुवर्णा, माजी नगरसेवक 

राजकारणी निवडणूक आली की, मंडळांचा पैसे देऊन राजकारणासाठी वापर करतात; पण ते त्याच पैशात रस्त्यावरील खड्डे मात्र बुजवत नाहीत. आमचे मंडळ कोणाकडूनही पैसे घेत नाही; पण एक आहे की, चार वर्षे गणेशोत्सव मंडळांना न विचारणारे पाचव्या वर्षी मात्र पैसे घेऊन मागे फिरतात. आता मंडळेही हुशार झाली आहेत. ती चार वर्षांची कसर यात भरून काढत आहेत. 
प्रदीप जंगम, अध्यक्ष, श्रद्धा सबुरी गणेशोत्सव मंडळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com