गणेशपुरीत रस्त्या अभावी आबाल वृद्धांना मतदान करताना होणार त्रास

ganeshpuri.jpg
ganeshpuri.jpg

वज्रेश्वरी :  भिवंडी तालुक्यातील सुपरिचित अशा गणेशपुरी या तीर्थक्षेत्र मध्ये रस्त्याच्या कामात ठेकेदाराच्या हलगर्जीपणामूळे उद्या भिवाळी येथे होणारया मतदान केंद्रावर मतदान करताना वृध्द जेष्ट नागरिकांना खूप अंतर रस्त्या अभावी व उंच चालू असलेल्या कॉंक्रिट रस्त्याच्या अडचणींमुळे मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे

गणेशपुरी येथे एमएमआरडीएमार्फत काही दिवसांपूर्वी अंतर्गत रस्ते मंजूर करणयात आले आहे, सदर रस्याच्या ठेका शिवशाही कॉन्स्ट्रकॅशन ठाणे या कंपनीला देण्यात आला. मात्र ठेकेदारच्या मनमानी कारभारामुळे भिवाळी ते गणेशपुरी या सिमेंट कॉंक्रिट रस्ता बनविण्याच्या कामात सदर ठेकेदार दिरंगाई करत असून त्याचा फटका उद्या या ठिकाणी होणाऱ्या मतदान केंद्रावर होणार आहे.

उद्या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकसाठी भिवाळी हे मतदान केंद्र ठरविण्यात आले आहे. मात्र या केंद्रावर मतदान करण्यासाठी रस्ता अभावी ना वाहने जाऊ शकत, ना धड चालता येणार कारण की रस्ताचे काम अर्धवट असून तसेच कुठलाही पर्यायी वाहन मार्ग या ठिकाणी नाही. तसेच रास्त्याचे काम उंच असल्याने येथे वृद्ध नागरिकांना चालताना मोठी कसरत करावी लागणार आहे. तसेच ठिकठिकाणी माती टाकून तयावर पाणी मारल्याने सर्वत्र चिखल झाला आहे. त्यामुळे येथे मतदान करते वेळी मोठी हैराणी होणार आहे. येथील या समस्येमुळे मतदानचा टक्का घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परिसरात ग्रामस्थांमध्ये ठेकेदार विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com