अंबरनाथ : तरुणीवर मित्रांकडूनच सामूहिक बलात्कार; तीन आरोपींना अटक | Ambarnath crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rape case
अंबरनाथ : तरुणीवर मित्रांकडूनच सामूहिक बलात्कार; तीन आरोपींना अटक

अंबरनाथ : तरुणीवर मित्रांकडूनच सामूहिक बलात्कार; तीन आरोपींना अटक

अंबरनाथ : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अंबरनाथ (Ambarnath) येथे तरुणांच्या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली असताना, त्यापाठोपाठ दुसऱ्या दिवशी शहरात तिघा मित्रांनी एका तरुणीवर सामूहिक बलात्कार (gang rape on girl) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तिघा आरोपींना पोलिसांनी अटक (three culprit arrested) केल्याची माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे (shivaji nagar police station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर भोगे यांनी दिली. या घटनेनंतर अंबरनाथ हदरले आहे. (Gang rape on a girl in ambarnath three culprit arrested by shivaji nagar police)

हेही वाचा: मुंबई : विद्यार्थ्यांना लसकवच! 28 दिवसांत लसीकरण पूर्णत्त्वाचे लक्ष्य

अंबरनाथच्या आनंदनगर अतिरिक्त औद्योगिक भागातील जीआयपी धरण परिसरात रविवारी (ता. २) हा प्रकार घडला. या धरण परिसरात तरुणी आणि तिचे तिघे मित्र फिरण्यासाठी गेले होते. यावेळी या तिन्ही मित्रांनी या तरुणींवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर तरुणीने अंबरनाथ पूर्वतील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

तरुणीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. हे तिन्ही आरोपी २५ ते ३० वयोगटातील असून तक्रारदार तरुणीचे ते मित्र आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर भोगे यांनी दिली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top