Crime News : बनावट मार्कशिट विकणारी टोळी गजाआड

दहावी-बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना विकणाऱ्या टोळीचा मुंबई पोलीसांनी पर्दाफाश केला
gang selling fake marksheets arrested mumbai police action crime branch
gang selling fake marksheets arrested mumbai police action crime branch esakal

मुंबई : दहावी-बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना विकणाऱ्या टोळीचा मुंबई पोलीसांनी पर्दाफाश करण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखा युनिट 6 ने चेंबूर परिसरात इयत्ता 10वी आणि 12वीच्या बनावट मार्कशीट विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून 4 जणांना अटक केली. मार्कशीट चार हजार रुपयांना विकली जात होती.

सलमान खान, मोहम्मद नदीम शेख, मोहम्मद मुर्तुजा, दानी खान अशी अटक आरोपींची नावे आहेत. या चारही आरोपींना चेंबुर परिसरातून अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com