मुंबईत चालत्या मोटारीत महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 जुलै 2017

मुंबईतील चारकोप परिसरात एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर चालत्या मोटारीत सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुंबई - मुंबईतील चारकोप परिसरात एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर चालत्या मोटारीत सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

चारकोप परिसरात गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास पीडित तरुणी महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी एक मोटार तिच्या जवळ आली आणि तिचे अपहरण करण्यात आले. त्यावेळी मोटारीमध्ये तीन जण होते. त्यानंतर त्यांनी तिला मालाडमधील मढ येथे नेऊन बलात्कार केला. या प्रकरणी चारकोप पोलिस स्थानकात अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा नोंद झाला आहे. मात्र या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. अधिक तपास सुरु आहे.

Web Title: gangrape mumbai news charkop news rape case