अतिक्रमण कारवाईत सापडला गांजा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

एकीकड़े अमली पदार्थ विरोधी पथक कोकेन, गांजा विक्री करणाऱ्यांवर करडी नज़र ठेवून असताना खारघरमध्ये सर्रास चरस, गांजा या अंमली पदार्थ विक्री होत असल्याचे उघड़ झाले आहे. 31 डिसेंबर येत असल्याने पार्टीसाठी अमली पदार्थांचा सुळसुळाट होत असतो. 

खारघर : भंगार दुकानावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाला गांजा सापडल्याची धक्कादायक घटना आज खारघर मध्ये घडली. 

पनवेल पालिका खारघर प्रभाग अधिकारी भगवान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण पथक खारघर सेक्टर 10 हायब्रेक हॉटेल शेजारील नाल्यालगत असलेल्या भंगार दुकानावर कारवाई करताना एका पान टपरीवर काही सिगारेटचे पॅकेट दिसले. अतिक्रमण पथकातील कर्मचारी संतोष ठाकूर, जितू मढवी टपरीवर पाहिले असता, त्याठिकाणी 10 ग्रामच्या 7 गांजाच्या पड्या दिसून आला. सदर अतिक्रमण पथकाने खारघर पोलिसांना माहिती दिल्यावर सदर पुढ्या पोलिसांनी जप्त केल्या.

एकीकड़े अमली पदार्थ विरोधी पथक कोकेन, गांजा विक्री करणाऱ्यांवर करडी नज़र ठेवून असताना खारघरमध्ये सर्रास चरस, गांजा या अंमली पदार्थ विक्री होत असल्याचे उघड़ झाले आहे. 31 डिसेंबर येत असल्याने पार्टीसाठी अमली पदार्थांचा सुळसुळाट होत असतो. 

Web Title: Ganja found in the encroachment operation