esakal | गणरायाला आकर्षक फेटा परिधान करण्याचा ट्रेंड वाढला
sakal

बोलून बातमी शोधा

Ganpati Festival

गणरायाला आकर्षक फेटा परिधान करण्याचा ट्रेंड वाढला

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : बाप्पाला आकर्षक रोषणाईत (Ganpati Decoration), उत्तम देखाव्यात पाहण्याचा सर्वांना मानस असतो. यात आता गणरायाला आकर्षक फेटा (Beautiful Pheta) आणि धोतर परिधान करून सजविण्याचा ट्रेंड (New trend) सुरू आहे. फेटा घालण्याची प्रथा जुनीच असली तरी, यंदा विविध रंगी फेटा घालण्याची मागणी वाढली आहे.

हेही वाचा: अकरावी तिसरी गुणवत्ता यादी; अजूनही 50 टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश होणे बाकी

फेट्यात आकर्षक दिसणाऱ्या गणरायाच्या साजिऱ्या मूर्ती भाविकांना भावत आहेत. मूर्ती, सिंहासन, शेला, गादी यांचे रंगकामासोबतच मूर्तिकार वस्त्र सजवण्याचा कामात व्यस्त असलेले सध्या दिसत आहेत. दरम्यान, मागील काही वर्षांमध्ये मूर्तीवर वेल्हेट धोतर आणि कापडी शेला असणाऱ्या मूर्तींना मागणी होती. परंतु, सध्या खऱ्या वस्त्र आणि काठा पदराच्या वस्त्रांना गणेशभक्तांकडून सर्वाधिक मागणी आहे.

गणेशोत्सवाची तयारी दोन ते तीन महिने आधीपासून सुरू झालेली असते. परंतु, खरी लगबग गणेशोत्सवाच्या अखेरच्या दोन ते तीन दिवसात पाहायला मिळते. मूर्तिकार गणरायावर अखेरचा हात फिरवत असताना वस्त्र कलाकार गणरायाच्या अंगावरील वस्त्रे, शेले, फेटा याच्या आकर्षक सजावटीत व्यग्र असतात. दरम्यान, काही मंडळे दररोज फेटा, धोतर बदलून घेत आहेत. सध्या एकूण 12 ते 13 गणरायांना फेटा आणि धोतर लावले आहेत, असे वस्त्रकलाकार प्रकाश लहाने यांनी सांगितले.

मागीलवर्षी कोरोनामुळे अनेक गणेशोत्सव मंडळांनी गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली नाही. त्यामुळे मागील वर्षी दोन टक्के व्यवसाय झाला. मात्र, यंदा सुमारे 20 ते 30 टक्के व्यवसाय होत आहे. परंतु, कोरोना येण्याआधीपेक्षा कमी आहे, असे लहाने यांनी सांगितले. गणेशभक्तांनी यंदा नयनरम्य, आकर्षक, विविध प्रकारच्या पितांबर शैली, फेट्यांची मागणी आहे. यानुसार यंदा ठिकठिकाणी पितांबर आणि फेट्यात खुलून दिसणाऱ्या गणरायाच्या मूर्ती पाहायला मिळत आहेत, असे लहाने यांनी सांगितले.

loading image
go to top