esakal | अकरावी तिसरी गुणवत्ता यादी; अजूनही 50 टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश होणे बाकी
sakal

बोलून बातमी शोधा

Online Admission

अकरावी तिसरी गुणवत्ता यादी; अजूनही 50 टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश होणे बाकी

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : मुंबई, पुणे, पिंपरी, चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या महानगरपालिका क्षेत्रात (municipal Area) सोमवारी 13 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता अकरावी ऑनलाइन प्रवेशाची (online admission) तिसरी गुणवत्ता यादी (third list) होणार आहे. यासोबतच इनहाऊस (inhouse), मॅनेजमेंट कोटा, आणि अल्पसंख्यांक कोट्यातील प्रवेशाची सुद्धा तिसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

हेही वाचा: परतीच्या हंगामासाठीही एसटी सज्ज; रविवार पर्यंत 1500 बसेस फुल

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्याना 15 सप्टेंबर पर्यंत संबधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येणार असल्याची माहिती शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली. तिसऱ्या गुणवत्ता यादीत ज्या विद्यार्थ्यांना जागा अलोट होतील, त्यांना आपल्या लॉगिनवर महाविद्यालयाची माहिती आणि कट ऑफ ही पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच यासाठीचे एसएमएस विद्यार्थ्याला पाठवले जाणार आहेत.

या गुणवत्ता यादीत जागा अलोट झालेल्या विद्यार्थ्यांना 15 सप्टेंबरपर्यंत संबंधित महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश घेणे बंधनकारक आहे तर त्यानंतर 16 सप्टेंबर रोजी ज्या अल्पसंख्यांक महाविद्यालयांमध्ये कोट्यातील प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्या आहेत, त्या जागा ऑनलाईन प्रवेशासाठी समर्पित करणे आवश्यक आहे. या जागा समर्पित झाल्यानंतर अकरावीच्या पुढील ऑनलाईन प्रवेश फेरीसाठी उपलब्ध असलेल्या जागांची माहिती पोर्टलवर दिली जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

हेही वाचा: राज्यात कोरोना रुग्ण पुन्हा वाढण्याची भीती; 75 टक्क्यांहून अधिक सक्रिय रुग्ण

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या दुसऱ्या प्रवेश फेरीची प्रक्रियाही 7 सप्टेंबर रोजी पूर्ण झाली होती. यादरम्यान राज्यातील पाच महापालिका क्षेत्रात उपलब्ध असलेल्या ऑनलाइन प्रवेश यांच्या जागांपैकी तब्बल 50 टक्के हून अधिक जागा अद्यापही प्रवेशावीना रिक्त राहिल्या आहेत. या जागा भरण्यासाठी शिक्षण संचालनालयाकडून तिसऱ्या फेरीचे नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबई महानगर क्षेत्रात अकरावी ऑनलाईन प्रवेशाची पहिल्या आणि दुसरी फेरी अखेर 7 स्पटेंबरपर्यंत इनहाऊस, अल्पसंख्यांक आणि व्यवस्थापन कोटा मिळून एकूण 1 लाख 8 हजार 402 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. यातील पहिल्या फेरीत 58 हजार 300, दुसऱ्या फेरीत 21 हजार 116 आणि कोट्याद्वारे 28 हजार 986 जणांचे प्रवेश झाले आहेत तर सुमारे 2 लाखांच्या दरम्यान जागांवर अजुनही प्रवेश होणे बाकी आहेत.

loading image
go to top