esakal | गणेशोत्सवानंतर दररोज 60,000 कोविड चाचण्यांचे पालिकेचे लक्ष्य
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Test

गणेशोत्सवानंतर दररोज 60,000 कोविड चाचण्यांचे पालिकेचे लक्ष्य

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : गणेशोत्सवानंतर (Ganpati festival) कोविड -19 रुग्णांमध्ये (corona patients) वाढ होण्याची शक्यता असून मुंबई महानगरपालिकेने (BMC) प्रभाग अधिकाऱ्यांना कोविडसाठी दररोज जास्तीत जास्त चाचण्या (corona test) करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पालिकेचे लक्ष्य आहे की संक्रमित रूग्णांची लवकर ओळख पटवण्यासाठी रॅपिड अँटीजन चाचण्यांसह (RAT) दररोज जवळपास 60,000 चाचण्या कराव्यात.

हेही वाचा: अतिवृष्टीमुळे मोखाड्यात घरांची पडझड; सुदैवाने जीवितहानी टळली 

सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवादरम्यान कोविड -19 चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार, 10 सप्टेंबर रोजी, पालिकेने 50,000 चाचण्या केल्या तर, रविवारी (12 सप्टेंबर) 29,849 आणि सोमवारी  25,581 वर चाचण्या घसरल्या. गेल्या वर्षी, कोविड-योग्य वर्तनाचे उल्लंघन केल्यामुळे गणेश चतुर्थीनंतर कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली होती.

“  सणामुळे चाचण्यांची संख्या कमी आहे. पण, सण संपल्यानंतर चाचणी वाढवण्याची सूचना आम्ही प्रभाग अधिकाऱ्यांना केली आहे. आम्ही दररोज 60,000 पर्यंत चाचण्या वाढवण्यावर लक्ष ठेवत आहोत जेणेकरून संक्रमित रुग्णांना लवकर ओळखू शकू, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

हेही वाचा: चाचण्यांवर भर; पालिका आणि नगरसेवक नागरिकांना करणार जागरूक

गेल्या एका आठवड्यात, चाचणी पॉझिटिव्हीटी दर (टीपीआर) 1% पेक्षा अधिक आहे जो पूर्वी 0.8% होता. सोमवारी टीपीआर 1.36% होता. हे लक्षात घेऊन, जास्तीत-जास्त चाचण्या करण्याची पालिकेची योजना आहे.  लोकसंख्या असलेल्या भागात, विशेषत: रेल्वे स्थानक, बाजारपेठ आणि मॉलमध्ये तरंगणाऱ्या गर्दीवर चाचण्या घेतल्या जातील. आम्ही दुकानदार आणि विक्रेत्यांचीही चाचणी घेऊ, असेही काकाणी यांनी सांगितले. वैद्यकीय तज्ज्ञांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी त्यांनी अधिक आरटीपीसीआर चाचण्या घेण्यावर भर दिला आहे.

5 टक्के नमुन्यांची जिनोमिक चाचण्या गरजेच्या

राज्याच्या कोविड -19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ. केदार तोरस्कर यांनी सांगितले की, “ चाचणी आणि लसीकरणामध्ये अपेक्षित तिसऱ्या लाटेवर नियंत्रण ठेवण्याची ताकद आहे. दररोज 60,000 पेक्षा जास्त लोकांची चाचणी करणे आवश्यक आहे. यातून, लवकर उपचार होण्यास मदत होईल ज्यामुळे मृत्युदर कमी होईल. फक्त चाचण्याच नाही तर त्यासह ट्रॅकिंग आणि मायक्रो कंटेनमेंट करणे गरजेचे आहे. नव्या व्हेरियंटसाठी किमान 5 टक्के नमुने जिनोमिक चाचण्यांसाठी पाठवल्या पाहिजेत. तरच, डेल्टा व्हायरस किती धोकादायक आहे समजेल. ”

loading image
go to top