esakal | 'पुनश्च हरिओम' म्हणत गिरणगावाचा गणपतीचा देखावा उभारला
sakal

बोलून बातमी शोधा

Ganpati Decoration

'पुनश्च हरिओम' म्हणत गिरणगावाचा गणपतीचा देखावा उभारला

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : गणेशोत्सव (Ganpati Festival) म्हटले की, प्रत्येकजण आपआपली कला गणपती देखाव्यातून (Decorations) सादर करतो. देखावा छोटा असला तरी, उठावदार आणि प्रबोधन देणारा (Social message) असावा, असा गणेशभक्तांचा (Ganesha Devotees) मानस असतो. यातच परळ (parel) येथे राहणाऱ्या पराग सावंत (parag sawant) यांनी यंदा गणपतीसाठी 'पुनश्च हरिओम' म्हणत गिरणगावाचा (Girangaon) देखावा उभारला आहे. घरातच 4 बाय 6 जागेत गणपतीचा देखावा उभारून प्रबोधनाचा संदेश दिला आहे.

हेही वाचा: रविवारी मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लाॅक

गणपती आले की, लालबाग-परळ मधील प्रत्येक चाळ रोषणाईने सजलेली दिसते. दुकाने नवनवीन वस्तूंनी नटलेली दिसतात. संपूर्ण वातावरण अगदी प्रसन्न झालेले असते. मात्र, हेच लालबाग-परळ एकेकाळी 'गिरणगाव' म्हणून ओळखले जात होते. 'गिरणगाव' म्हणजे गिरण्यांचे गाव’. मागील काही वर्षात गिरणगावाचा चेहरामोहराच बदलला आहे. इथल्या गिरण्यांची जागा टोलेजंग टॉवर आणि मॉल्सने घेतली. तर काही गिरण्या अजुन इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत.

तर या गिरण्या पुन्हा सुरू झाल्या तर, खितपत पडलेले उंच भोंगे सुरू झाले तर, गिरण्याच्या आवारात शाहिराची शाहिरी टाल ऐकू आली तर, काय होईल, याचा पराग सावंत यांच्या संकल्पनेतून देखावा उभा राहिला आहे. परळ-लालबागची ओळख असलेली युनायटेड मिल, भारतमाता टॉकीज तयार केले आहे. देखाव्यातील युनायटेड मिल आणि भारत माता टॉकीजची प्रतिमा हुबेहुब साकारली आहे.

मुंबईला आर्थिक राजधानीचा मान गिरण्यांच्या गिरणगावामुळेच मिळाला आहे. मात्र, धावत्या काळात इतिहासाची साक्ष देण्याऱ्या काही गोष्टी अजूनही तशाच आहेत. त्यामुळे जुन्या पध्दतीने कष्टकऱ्यांच्या हातून गणेशोत्सव कसा साजरा झाला असता, हे दाखविण्यात आले आहे. देखाव्यातील प्रत्येक बाबीचे बारकाईने काम केले आहे. लालबाग-परळ भागात डोळ्यासमोर इतिहास आहे, मात्र तो दिसत नाही. हा इतिहास देखाव्यातून दाखविला आहे, असे पराग सावंत यांनी सांगितले.

हेही वाचा: सामान्य स्त्रीयांसाठीही कणव दाखवा; चाकणच्या ताईंना भाजपचा टोला

यंदाचा देखावा 12 ते 13 जणांच्या टीमने तयार केला. यातील काही जण जे.जे. आर्टमध्ये शिकत आहेत. तर, काही जणांच्या अंगात उपजत कला आहे. 4 बाय 6 मध्ये संपूर्ण गिरणगाव दाखविणे आव्हानात्मक होते. मात्र, हे आव्हान स्वीकारून काम केले. संपूर्ण देखावा इकोफ्रेंडली आहे. प्लाय, कागद, पुठ्ठा यांचा वापर करून केला आहे. तर, 1 फुटाची गणरायाची मूर्ती विराजमान केली आहे. देखावा तयार करण्यासाठी साधारण 35 ते 40 हजार रुपये खर्च आला असल्याचे सावंत यांनी सांगितले. मागील वर्षी कोरोना काळात बीबीडी चाळीचा देखावा होता. हा देखावा संग्रहित करण्यासारखा तयार केला होता. त्यामुळेच भायखळा येथील भाऊ दाजी लाड संग्रहालयात हा देखावा ठेवला आहे.

loading image
go to top