esakal | गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासाचे आरक्षण; रेल्वे स्थानकात मिळणार प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

Konkan Railway

गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासाचे आरक्षण; रेल्वे स्थानकात मिळणार प्रवेश

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त (Ganpati Festival) मुंबई, पुणे (mumbai-pune) येथून मोठ्या संख्येने गणेशभक्त (Ganesha Devotees) कोकणात गेले. त्यानंतर दीड दिवसांचा गणपती विसर्जन करून गणेशभक्तांचा परतीचा प्रवास सुरु होणार आहे. मात्र, परतीच्या प्रवासासाठी ज्या गणेशभक्तांचे रेल्वेचे कन्फर्म तिकीट (Railway confirm ticket) आहे, त्यांनाच स्थानकात आणि ट्रेनमध्ये प्रवेश (Train permission) दिला जाणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने (Konkan Railway) दिली.

हेही वाचा: प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांना मिळणार पाणी; म्हाडा विजेत्यांना दिलासा

गणेशोत्सवानिमित्त मुंबई, पुणे, नागपूर येथील गणेशभक्तांचा प्रवास गर्दीमुक्त करण्यासाठी अतिरिक्त गाड्या सोडण्यात येतात. याचनिमित्त भारतीय रेल्वेने 261 गणपती विशेष गाड्या विविध ठिकाणांवरून चालवित आहेत. गणपती विशेष गाड्यांमध्ये मध्य रेल्वे 201, पश्चिम रेल्वे 42, कोकण रेल्वेवरून 18 गाड्या चालवण्यात येत आहेत. मात्र, या गाड्यातून प्रवास करताना आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांच प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे परतीच्या प्रवासावेळी देखील चाकरमान्यांना नियमांच्या चौकटीत राहून प्रवास करावा लागणार आहे.

कोरोनाच्या काळात स्थानकात अथवा स्थानकाबाहेर, रेल्वे हद्दीच्या परिसरात गर्दी होऊ नये, याकरिता कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्थानकात बॅरेकेटिंग केले आहे. तसेच, आरोग्य विभागाच्या माध्यमातून येणाऱ्या प्रवाशाची तपासणी करून नोंद घेतली जात आहे. रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवले जात आहे. अशातच कोकणात गेलेल्या ठराविक चाकरमान्यांचा परतीचा प्रवास दीड दिवसाचे गणराय विसर्जन केल्यानंतर सुरू होणार आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच गर्दी होऊ नये, यासाठी कोकण रेल्वेने सावध पावले उचलली आहेत.

हेही वाचा: मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या नव्या 365 रुग्णांची भर; 4 जणांचा मृत्यू

यामध्ये त्यांनी परतीच्या प्रवासावेळी आरक्षण असलेल्या प्रवाशांनीच स्थानकात यावे. ज्या प्रवाशांकडे आरक्षण नाही त्यांनी स्थानकात येत गर्दी करू नये, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाकडून केले आहे. दरम्यान, कोकण रेल्वेतून फक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्याची मुभा दिली आहे. ज्या प्रवाशांकडे कन्फर्म तिकीट नसेल, त्यांना ट्रेन अथवा स्थानकात प्रवेश नाकारला जात आहे. रेल्वे तिकीट नसलेल्यांना स्थानकात येण्यासाठी फलाट तिकीट काढून स्थानकात प्रवेश मिळू शकेल, अशी माहिती कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.

loading image
go to top