esakal | ठाकुर्ली: गणपती विसर्जनात गणेश भक्तांचे अपघाताला आमंत्रण
sakal

बोलून बातमी शोधा

Railway crossing

ठाकुर्ली: गणपती विसर्जनात गणेश भक्तांचे अपघाताला आमंत्रण

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : श्री गणेशाची (Ganpati festival) मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर पाच दिवसांच्या गणपतीला मंगळवारी निरोप देण्यात आला. ठाकुर्लीतील (thakurli) कचोरे परिसरातील भाविक कचोरे विसर्जन घाटावर गणपती विसर्जनासाठी (Ganpati visarjan) येतात. मात्र घाटावर जाण्यासाठी भाविकांना रस्ता नसल्याने रेल्वे रूळ ओलांडून (Railway track crossing) जावे लागते. पालिकेने (KDMC) यंदा पाण्याच्या टाकीची व्यवस्था केली असली तरी ती अपुरी असल्याने अनेकांनी घाटावरच बाप्पाचे विसर्जन केले.त्यामुळे यंदाही बाप्पाला रेल्वे रूळ ओलांडूनच भक्तांचा निरोप घ्यावा लागला. तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनाही रुळांवर उतरावे लागल्याचे दिसून आले.

हेही वाचा: टंचाईग्रस्त कांबे गावाला गणेशोत्सवात रोज टँकर; हायकोर्टात सरकारची हमी

मंगळवारी पाच दिवसांच्या गौरी गणपतीला भावपूर्ण वातावरणात भक्तांनी निरोप दिला. कल्याण ठाकुर्ली च्या मध्ये असलेल्या कचोरे गावात साधारण हजाराच्या आसपास गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होते. या बाप्पांचे विसर्जन कचोरे विसर्जन घाटावर केले जाते. मात्र घाटावर जाण्यासाठी रस्ता नसल्याने दरवर्षी रेल्वे रूळ ओलांडून भाविक गणपती विसर्जनासाठी जातात.

विसर्जन दिवशी या ठिकाणी स्थानिक सगरदेवी सेवक मंडळ आणि आरपीएफ जवान, पोलीस यांच्या मदतीने गणेश भक्तांनि व्यवस्थितरित्या विसर्जन पार पडले. रेल्वे रूळ ओलांडणे हा गुन्हा असला तरी गणेश भक्तांसाठी पोलिसांनाही ट्रॅकवर उतरावे लागते अशी चर्चा नागरिक यावेळी करीत होते. रेल्वे रूळ ओलांडण्याचा हा जीवघेणा प्रवास टाळण्यासाठी कचोरे परिसरात कृत्रिम तलाव बांधण्यात यावा अशी मागणी तत्कालीन नगरसेविका रेखा चौधरी पालिका प्रशासनाकडे वारंवार करीत आहेत. यावर्षी पालिका प्रशासनाने विसर्जनसाठी पाण्याच्या टाकीची व्यवस्था केली. मात्र ही व्यवस्था अपुरी असल्याने भाविकांनी खाडी किनारी विसर्जन करण्याचे ठरविले.

loading image
go to top