बाप्पाच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचे काम अंतिम टप्प्यात

दिनेश गोगी
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

उल्हासनगर : नदीच्या स्वच्छ पाण्याच्या प्रवाहात बाप्पाच्या विसर्जनासाठी मनाई करण्यात आल्याने त्यावर सकारात्मक पर्याय म्हणून उल्हासनगरात कृत्रिम तलावांची बांधणी केली जात असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

2003 मध्ये नगरसेवक सुरेश जाधव यांच्या पुढाकाराने मुंबई-ठाणे जिल्ह्यातील पहिला कृत्रिम तलाव हा रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला बांधण्यात आलेला आहे.तेंव्हापासून या तलावात बाप्पाच्या लहान किंबहूना पाच फुटापर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात येते. विशेषतः कॅम्प नंबर चार मधील गणेशभक्तांसाठी हा तलाव सोयीचा ठरत आहे.

उल्हासनदी, वालधुनी नदी, कल्याणची खाडी येथे लहान-मोठ्या मूर्तींचे विसर्जन केले जात होते.मात्र तीन वर्षांपासून कल्याणच्या खाडीत विसर्जनाची मनाई करण्यात आलेली असून आता नदीच्या स्वच्छ पाण्याचा प्रवाह दूषित होत असल्याने नदी वर विसर्जनास एका सामाजिक संस्थेने न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे.

त्या अनुषंगाने आयडीआय कंपनीचे कंपाऊंड, सेंच्युरी रेयॉन कंपणी व कैलास कॉलनी येथे बाप्पाच्या विसर्जनासाठीचे कृत्रिम तलाव बांधण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. आयुक्त गणेश पाटील, पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे, पालिका अधिकारी संतोष जाधव, गणेश शिंपी, भगवान कुमावत, नंदलाल समतानी, महेश सितलानी, जितू चोईथानी, संदीप जाधव, तरुण सेवकानी ,डॉ.राजा रिजवानी, यशवंत सगळे, एकनाथ पवार, हिराली फाऊंडेशनच्या सरिता खानचंदानी यांच्या देखरेखीखाली कृत्रिम तलाव बांधण्याचे काम  अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विनोद केणे यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganpati visarjan pond ready in ulhasnagar