कचऱ्यासोबत खारफुटीही जळतेय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

मुंबई - आक्‍सा किनाऱ्यावरील स्वच्छतेच्या नावाखाली खारफुटीच साफ झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. किनाऱ्यावरील कचरा खारफुटीत टाकून मध्यरात्री जाळला जात आहे. या प्रकारामुळे 100 मीटरपर्यंतची खारफुटी नष्ट झाली आहे. घटनास्थळी पाहणी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे कांदळवन विभागाकडून सांगण्यात आले.

आक्‍सा किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. हा कचरा खारफुटीत टाकला जात आहे. हा कचरा रात्री जाळण्यात येतो, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे आतापर्यंत 100 मीटरपर्यंत खारफुटी नष्ट होऊनही त्याकडे सरकारी यंत्रणेचे लक्ष गेलेले नाही, याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. याबाबत कांदळवन विभागाने हा परिसर खारफुटी म्हणून अधिसूचित नसल्याची शक्‍यता व्यक्त केली आहे.

Web Title: garbage aksa beach cleaning