esakal | कचरा वेचक महिला महानगरपालिकेचे कचऱ्याचे टेंशन संपवणार
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

कचरा वेचक महिला महानगरपालिकेचे कचऱ्याचे टेंशन संपवणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कचरा वेचक (Garbage pickers) महिलांच्या मदतीने देवनार डम्पिंगसह (Dumping) पाच ठिकाणी कचऱ्याचे वर्गिकरण करण्यात येणार आहे. तसेच, या महिलांवर (Womens) कचऱ्याच्या पुनर्वापराची प्रक्रिया करण्याची जबाबदारीही देण्यात येणार आहे.

मुंबईत रोज तयार होणाऱ्या ६ हजार मेट्रीक टन कचऱ्यापैकी २६०० मेट्रीक टन कचऱ्याचे वर्गिकरण करण्याची जबाबदारी या कचरा वेचक महिलांवर सोपविण्यात येणार आहे. या कचऱ्याचे वर्गिकरण केल्यानंतर त्यांना हा कचरा प्रक्रिया करण्यासाठी विकता येणार आहे; मात्र कचऱ्याच्या पुनर्वापराची होणे बंधनकारक राहाणार आहे.यातून कचरा वेचक महिलांना उत्पन्न मिळेल.

महानगर पालिकेसाठी कचरा वेचक संस्थांकडून अर्ज मागवले आहेत.या संस्था प्रकि्रया प्रकल्पाशी सलग्न असणे बंधनकारक आहे.घन कचरा व्यवस्थापन नियमावली नुसार कचरा वेचक महिलांची मदत कचरा व्यवस्थापनात घेणे गरजेचे आहे.यात,महानगर पालिकेचा कोणताही खर्च होणार नाही.मात्र,कचऱ्यातील पुनर्वापर करता येईल अशा वस्तू विकून कचरा वेचक महिलांना उत्पन्न मिळेल असा विश्‍वास पालिकेचे अधिकारी व्यक्त करतात.

हेही वाचा: मुंबईत अमानुष प्रकार; पाहा व्हिडिओ

मोठ्या संकुलांना महानगर पालिकेचे ओल्या कचऱ्यावर प्रकि्रया करणे बंधनकारक केले आहे.मात्र,अद्याप वस्त्या आणि लहान संकुलातील कचऱ्याचे वर्गिकरण होत नाही.त्यामुळे कचऱ्यातून भंगार समान तसेच प्रकि्रया करात येणा सारखा कचरा वेगळा केल्यास डंपिंगवर येणार ताण कमी होणार आहे.त्यामुळे ही संकल्पना पुढे आली आहे.

loading image
go to top