esakal | उल्हासनगर महानगरपालिके समोर कचऱ्याच्या गाड्या
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

उल्हासनगर महानगरपालिके समोर कचऱ्याच्या गाड्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : ऐन गणेशोत्सवात पगार थकवण्यात आल्याने कचरा उचलणाऱ्या कामगार, गाडीवरील चालकांनी चक्क उल्हासनगर (Ulhasnagar) पालिके समोर कचऱ्याच्या गाड्या उभ्या करून आंदोलन केले. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड (Sandeep Gaikwad ) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे.

हेही वाचा: लाईट बिलाची होळी करत विज कंपनीच्या विरोधात 'बोंबा मारो' आंदोलन

कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला उल्हासनगरातील कचरा उचलण्याचा कंत्राट देण्यात आला आहे. यात ५०० कामगार, चालक कंत्राटी पद्धतीने काम करत असून त्यांना श्रेणीनुसार पगार देण्यात येतो. काही महिन्यांपासून पालिकेच्या वतीने वेळेवर कंत्राटदाराला बिल मिळत नाही. यावेळेस कंपनीकडे ५०० कामगारांच्या पगारासाठी पैसे नसल्याने पगार देता येत नसल्याची माहिती कोणार्कचे संचालक राजेश वधारिया यांनी दिली. दरम्यान कामगारांच्या आंदोलनाची दखल घेऊन पालिका आयुक्त डॉ.राजा दयानिधी यांच्या आदेशानुसार लेखा विभागाने कामगारांचा पगार कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या खात्यात जमा केला आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी दिली आहे.

loading image
go to top