

Gargai Dam Project
ESakal
मुंबई : मुंबईच्या भविष्यातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन महापालिकेने महत्त्वाकांक्षी गारगाई धरण प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी हालचाली वेगवान केल्या आहेत. या प्रकल्पांतर्गत धरण बांधणे, बोगदा तयार करणे आणि इतर तांत्रिक कामांवर देखरेख ठेवण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. त्यासाठीची निविदा नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.