कोकण विभागातील साडेचार लाख कुटुंबांना गॅस जोडणी

कोकण विभागातील साडेचार लाख कुटुंबांना गॅस जोडणी
कोकण विभागातील साडेचार लाख कुटुंबांना गॅस जोडणी

मुंबई : कोकण विभागातील बिगर गॅस जोडणीधारकांना राज्य शासनामार्फत गॅसजोडणी वितरित करण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र योजना आखली आहे. यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कोकण विभागातील साडेचार लाख कुटुंबांना गॅसजोडणी मिळणार असून, बिगरगॅस जोडणीधारक कुटुंबांनी तहसील कार्यालयात अथवा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे संपर्क साधून गॅसजोडणी उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहन कोकण विभागाचे महसूल आयुक्त शिवाजीराव दौंड यांच्याकडून करण्यात आले आहे. 

कोकण विभागात ४ लाख ७१ हजार १ एवढी कुटुंबे रेशनकार्डधारक असून, त्यांच्याकडे गॅस कनेक्‍शन नाही. यामध्ये रत्नागिरी विभागामध्ये १ लाख २८ हजार ७५२, रायगड विभागामध्ये १ लाख ९ हजार ९९९, पालघर विभागामध्ये ९६ हजार ४७२, ठाणे विभागामध्ये ७९ हजार १५२, सिंधुदुर्ग विभागामध्ये ५६ हजार ६२६ कुटुंबांचा समावेश आहे. 

एसईसीसी यामध्ये अर्जदाराचे अथवा कुटुंब सदस्याचे नाव असणे आवश्‍यक आहे. अर्जदार कुटुंबातील स्त्री असणे आवश्‍यक आहे, अर्जदाराचे वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्‍यक असून, अर्जदाराच्या कुटुंब सदस्याचे आधार कार्ड बंधनकारक आहे. बचत खाते एनएसीएच बॅंक मॅप असावे, उज्ज्वला केवायसी आणि पीओए/पीओआय (उपलब्ध असल्यास पासपोर्ट आकाराचा फोटो आलेख), डी-डुफ्लिकेशन अर्जदाराच्या/कुटुंबाच्या नावावर एलपीजी कनेक्‍शन असता कामा नये, रेशन कार्ड(पर्यायी) इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्‍यक आहे. चूलमुक्त, धूरमुक्त महाराष्ट्र ही संकल्पना राबविण्यासाठी कोकण विभागातील ज्या कुटुंबाकडे गॅसजोडणी नाही, अशा रेशनकार्डधारक कुटुंबांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कोकण आयुक्तांच्या वतीने करण्यात आले आहे.

आवश्‍यक अट व कागदपत्रे
अर्जदार कुटुंबातील स्त्री असणे आवश्‍यक आहे, अर्जदाराचे वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्‍यक असून, अर्जदाराच्या कुटुंब सदस्याचे आधार कार्ड बंधनकारक आहे. बचत खाते एनएसीएच बॅंक मॅप असावे, उज्ज्वला केवायसी आणि पीओए/पीओआय (उपलब्ध असल्यास पासपोर्ट आकाराचा फोटो आलेख), डी-डुफ्लिकेशन अर्जदाराच्या/कुटुंबाच्या नावावर एलपीजी कनेक्‍शन असता कामा नये, रेशन कार्ड(पर्यायी) इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्‍यक आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com