Ins ranvir
Ins ranvirFile Photo

INS Ranvir वरील स्फोटामागचं कारण आलं समोर; अधिकाऱ्यांनी दिली माहिती

या नौदलाच्या युद्धनौकेवर झालेल्या स्फोटात तीन नौदलाचे जवान शहीद झाले होते तर ११ जण जखमी झाले होते.

नवी दिल्ली : तीन नौदल अधिकाऱ्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या INS Ranvir वरील भीषण स्फोटामागील कारण आता समोर आलं आहे. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. एसी खोलीमधील गॅस लीक झाल्यानं हा स्फोट झाल्याचं अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितलं. (Gas leak in INS Ranvir air conditioning compartment could be behind blast)

Ins ranvir
अखिलेश यादव पहिल्यांदाच विधानसभेच्या मैदानात; पाहा कुठून लढणार?

या दुर्घटनेच्या चौकशीसाठी नौदलाकडून चौकशी समिती स्थापण्यात आली होती. या चौकशीतून हे समोर आलं की, मुंबई जवळील डॉकयार्डमध्ये उभ्या असलेल्या INS Ranvir या डिस्ट्रॉयर युद्धनौकेमध्ये मंगळवारी भीषण स्फोट झाला होता. एअर कंडिशन कंपार्टमेंटमधून वायू गळती झाल्यानं हा स्फोट झाला. या स्फोटावेळी या कम्पार्टमेंटमध्ये असलेल्या तीन नौदलाच्या जवानांचा यामध्ये मृत्यू झाला होता. तर इतर ११ जण जखमी झाले होते.

Ins ranvir
अमोल कोल्हेंच्या नथुराम भूमिकेवर जितेंद्र आव्हाड नाराज; म्हणाले, 'हे मला अजिबात...'

या स्फोटामध्ये कृष्णकुमार (वय ४७), सुरिंदर कुमार (वय ४८) आणि ए. के. सिंह (वय ३८) या तीन जवानांना आपले प्राण गमवावे लागले. तर इतर ११ जण जे यामध्ये जखमी झाले होते त्यांच्यावर नेव्हल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. यांच्यापैकी एकाचीही प्रकृती गंभीर नाही. पण या स्फोटमुळं युद्धनौकेचं मोठं नुकसान झालं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com