खालापूर परिसरात वायुगळती! गावकऱ्यांना डोळे चुरचुरणे आणि घसा खवखवण्याचा त्रास

मनोज कळमकर
Friday, 30 October 2020

तालुक्‍यातील पाली फाटा परिसरात गुरुवारी (ता. 29) रात्री वायुगळतीची घटना घडली असून परिसरातील गावामध्ये डोळे चुरचुरणे आणि घसा खवखवणे असे त्रास सुरू झाल्यानंतर भीतीचे वातावरण पसरले होते.

खालापूर  ः तालुक्‍यातील पाली फाटा परिसरात गुरुवारी (ता. 29) रात्री वायुगळतीची घटना घडली असून परिसरातील गावामध्ये डोळे चुरचुरणे आणि घसा खवखवणे असे त्रास सुरू झाल्यानंतर भीतीचे वातावरण पसरले होते. गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास देवन्हावे, वडवळ, साजगाव परिसरात धुकेसदृश वायू हवेत पसरला होता. हवेत गारवा असल्याने वायू हवेत बराच वेळ राहिला होता.

हेही वाचा - मास्क न घालणाऱ्यावर कारवाई करताना BMC कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला

रासायनिक विषारी वायू असल्याने परिसरात नागरिकांना त्रास जाणवू लागला. याबाबत समाजमाध्यमावर संदेश देखील व्हायरल झाला. परंतु नक्की कोणत्या कारखान्यातून वायू गळती झाली याबाबत ठोस माहिती मिळाली नसल्याचे नागरिकांमध्ये घबराट उडाली. दोन तासानंतर रासायणिक वायूचे हवेतील प्रमाण कमी झाल्यामुळे नागरिकांना होणार त्रास कमी झाला. 

हेही वाचा - मराठा समाजाचा आता आक्रोश मोर्चा; 7 नोव्हेंबरला पंढरपूर ते मंत्रालय पायी दिडी

पाली फाटा परिसरातील कारखान्यातून रासायणिक गळती झाल्याचा संशय व्यक्त झाल्याने आज सकाळी तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी पोलिलिंना त्या भागातील कारखान्यात माहिती घेण्याचे आदेश दिले .परंतु प्रत्येक कारखाना व्यवस्थापनाने आपले येथे वायु गळती झाल्याचे वृत्ताच इन्कार केला करत हात झटकले. त्यामुळे प्रदूषण मंडळाने याबाबत लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

 

गुरुवारी रात्री वायू गळतीचा प्रकार घडला. त्यानंतर तासाभरात त्याचे प्रमाण कमी झाले. कोणत्या कारखान्यातून गळती झाली याची तपासणी सुरू असून प्रदूषण नियामक मंडळाला याबाबत कळविण्यात आले आहे. 
- इरेश चप्पलवार,
तहसीलदार, खालापूर 

 

गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास रस्त्यावर देखील धुक्‍यासारखा पांढरा वायू होता. डोळ्याची आग आणि घसा खवखवणे या सारखा त्रास नागरिकांना जाणवत होता.नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कारखान्यावर कठोर कारवाई व्हावी. 
- संदिप ओव्हाळ,
रहिवाशी, ढेकू साजगाव 

gas leak in Khalapur area Villagers suffer from itchy eyes and sore throats

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gas leak in Khalapur area Villagers suffer from itchy eyes and sore throats