
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील पाथर्ली रोडचे सिमेंट काँक्रीटीकरणचे काम सुरू असताना महानगर गॅसची पाईपलाईन फुटली. जेसीबीने रस्ता खोदत असताना ही घटना घडली. रस्ते काम करताना कंत्राटदार योग्य पद्धतीने लक्ष देत नसून कामगारांना सूचना देखील करत नाहीत यामुळे अनेकदा पाण्याची पाईपलाईन, गॅस पाईपलाईन फुटण्याची घटना वारंवार घडत असून या घटनेमुळे पुन्हा एकदा कंत्राटदाराचा हलगर्जीपणा दिसून आला आहे.