

Health officials inspecting the affected areas in Mokhada after 78 residents were infected in a gastro outbreak.
Sakal
-भगवान खैरनार
मोखाडा: मोखाड्यातील बोरशेती येथे 30 ऑक्टोबर ला गॅस्ट्रोची साथ निर्माण झाली होती. आठ दिवसांत या साथीचा फैलाव अन्य तीन गावामध्ये देखील झाला आहे. आतापर्यंत गॅस्ट्रोने 78 रूग्ण बाधीत झाले असून यातील 65 रूग्ण ठिक झाले आहेत. तर 13 रुग्णांवर खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात ऊपचार सुरू आहेत. दुषीत पाण्यामुळे येथे गॅस्ट्रोची साथ निर्माण झाली आहे. साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाने येथे एक पथक तैनात केले आहे.