गेट वे ते मांडवा बोटीसाठी ई-तिकीट

- मंगेश सौंदाळकर
शनिवार, 21 जानेवारी 2017

प्रवाशांना सात दिवस आधी बोटीचे ऑनलाईन तिकीट बुक करता येणार आहे...

मुंबई - गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा बोटीसाठी आता ई-तिकीट मिळणार आहे. हा उपक्रम महाराष्ट्र सागरी मंडळाने (एमएमबी) सुरू केला आहे. ई-तिकिटामुळे पर्यटकांना रांग लावावी लागणार नाही. राज्यात प्रथमच सागरी प्रवासाकरता ई-तिकीट सुरू करण्यात आले आहे. प्रवाशांना सात दिवस आधी तिकीट बुक करता येईल. रकमेचा परतावाही ऑनलाईन मिळेल. 

देशातूनच नव्हे तर परदेशांतूनही पर्यटक अलिबाग, मांडवा व एलिफंटाला येतात. ‘गेट वे’हून तिन्ही ठिकाणी जाणाऱ्या बोटींच्या तिकिटांकरता दोन तास आधी रांग लावावी लागते. तिकीट मिळाल्यानंतरही पर्यटकांना दुसरी बोट येईपर्यंत थांबावे लागते. पर्यटकांना होणाऱ्या त्रासाची दखल अखेर ‘एमएमबी’ने घेतली आहे. प्रायोगिक तत्त्वावर गेट वे ते मांडवा प्रवासासाठी ई-तिकीट सुरू करण्यात येत आहे. पुढील टप्प्यात राज्यातील सर्व फेरीबोटींसाठीही ई-तिकीट उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.  पर्यटक सात दिवस आधी मोबाईल व लॅपटॉपवरून बोटीचे तिकीट आरक्षित करू शकतात. सुरुवातीला बारकोड पद्धत अवलंबण्यात आली आहे. 

पीएनआर क्रमांक मिळणार
रेल्वेप्रमाणेच बोटींतील प्रवाशांना पीएनआर क्रमांक दिला जाणार आहे. या क्रमांकावरून बोटीचे तिकीट मिळेल. पीएनआर दाखवल्यावर त्याची नोंद करून प्रवाशांना बोटीत प्रवेश दिला जाईल. तिकीट रद्द केल्यास रकमेचा परतावाही ऑनलाईन मिळेल. 

आगाऊ सूचना 
हवामानामुळे बोट बंद पडल्यास किंवा तांत्रिक अडचण आल्यास त्याची आगाऊ सूचना प्रवाशांना दिली जाणार आहे. प्रवासी गेट वेला वेळेवर पोहचल्यावरही त्यांना पोलिसांनी अडवले आणि बोट सुटली तर दुसऱ्या बोटीतून नेले जाईल, अशी माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल  पाटणे यांनी दिली.

Web Title: gate way of india to mandava boat e-ticket