गौतम नवलखा यांना उच्च न्यायालयाचा दिलासा 

गौतम नवलखा यांना उच्च न्यायालयाचा दिलासा 

मुंबई : माओवाद्यांशी कथित संबंधांच्या आरोपांप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा, प्रोफेसर आनंद तेलतुंबडे आणि स्टेन स्वामी यांना मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. 1) दिलासा दिला. 21 नोव्हेंबरपर्यंत या सर्वांना अटक करू नये, असे आदेश गुरुवारी न्यायालयाने दिले. 

कोरेगाव भीमा प्रकरण आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणात गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडे आणि स्टेन स्वामी यांनी केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयात याबाबतचे प्रकरण प्रलंबित आहे, अशी माहिती यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने खंडपीठापुढे देण्यात आली. त्यावर न्यायालयाचे आदेश येईपर्यंत वाट पाहू असे नमूद करत, या सर्वांना 21 नोव्हेंबरपर्यंत अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com