गे पेंग्विन लवकरच होणार नव्या बाळाचे पालक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

बर्लिनच्या प्राणिसंग्रहालयातील स्कीपर आणि किंग हे नर पेंग्विन लवकरच एका बाळाचे पालक होणार आहे. 

बर्लिन (वृत्तसंस्था) ः ते दोघे नेहमी एकत्र असायचे... एकत्रच खेळताना दिसायचे... नर असूनही त्यांच्या या कायम एकत्र राहण्याने त्यांचा सांभाळ करणाऱ्यांना काहीसे नवल वाटले. नंतर लक्षात आले की हे दोन्ही पेंग्विन गे होते. प्राणिसंगहायतील ही घटना. मग काय प्राणिसंग्रहालयातर्फे त्यांना पेंग्विन अंडे देण्यात आले. त्यामुळे हे जोडपे आता लवकरच नव्या बाळाचे पालक होणार आहेत.  

बर्लिनच्या प्राणिसंग्रहालयातील ही घटना. या प्राणिसंग्रहालयातील स्कीपर आणि किंग या गे पेंग्विन जोडीला त्यांचे कुटुंब वाढवायची इच्छा होती. काही दिवस ते एका माशाबरोबर खेळत होते... तर काही दिवस ते एका दगडासोबतही खेळत होते. हा सर्व प्रकार पाहून त्यांचा सांभाळ करणाऱ्यांनाही नवल वाटले. त्यांनी या दोन्ही पेंग्विन्सना एक अंडे दिले. या दोघांनीही ते अंडे आपलेसे केले. त्यामुळे स्कीपर आणि किंग हे लवकरच नव्या बाळाचे पालक होणार असून, प्राणिसंग्रहालयातील सर्वांनाच नव्या सदस्याच्या आगमनाची उत्सुकता आहे. 

यापूर्वी लंडन आणि आॅस्ट्रेलियातील प्राणिसंग्रहालायतही नर पेंग्विननेही बाळाला जन्म दिला आहे. जगभरात सुमारे साडेचारशे प्राण्यांमध्ये समलैंगिकतेची लक्षणे आढळतात, असे अभ्यासकांचे मत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gay penguin at the zoo in Berlin will soon have new baby parents