Mission Begin Again : ही घ्या साईट, कोविड आणि नॉन कोविड या दोन्ही रुग्णांसाठी कुठे किती बेड्स...

Mission Begin Again : ही घ्या साईट, कोविड आणि नॉन कोविड या दोन्ही रुग्णांसाठी कुठे किती बेड्स...

मुंबई : मुंबईतील कोविड-नॉन कोविड बेड्सची माहिती आता एका क्लिकवर घेता येणार आहे. पालिकेने अखेर कोविड आणि नॉन कोविड रुग्णालयांतील बेड्स ची माहिती रिक्त तक्त्यासहित ऑनलाइन केली आहे. त्यामुळे आतातरी रुग्णांची फरफट थांबेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईतील सरकारी,पालिका आणि खासगी रुग्णालयातील कोविड-नॉन कोविड बेड्स ची माहिती उपलब्ध करण्यासाठी डॅशबोर्डची सुविधा सुरू केली आहे. गरजूंना पालिकेच्या https://mumgis.mcgm.gov.in/MedicalFacility.html या साईटवर जाऊन बेड बाबतची माहिती जाणून घेता येणार आहे. या लिंकवर संशयित, पॉझिटव्ह, ICU बेड्स, व्हेंटिलेटर, डायलिसिस, नॉन कोविड अशी माहिती अपलोड केली आहे. 

पालिकेने सुरू केलेल्या या ऑनलाइन डॅशबोर्ड वर सरकारी,पालिका तसेच खासगी कोविड-नॉन कोविड असणाऱ्या 128 रुग्णालयांतील बेड्स ची माहिती देण्यात आली आहे. 10 हजाराहून अधिक बेडस सह रिक्त बेड्स ची माहिती ही घेता येणार आहे. क्वारंटाईन, आयसोलेशन पॉझिटिव्ह, आयसीयू, व्हेंटिलेटर बेड्स यासह डायलिसिस रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या बेड्सची माहीती देण्यात आली आहे.

मुंबईतील बेड्स ची माहिती

मुंबईतील सरकारी, पालिका, खासगी 128 रुग्णालायांत 10,337 बेड्स असून त्यातील 1,138 बेड्स रिक्त आहेत. त्यातील सरकारी 725 , पालिका 5512 , खासगी 4125 खाटांची माहिती देण्यात आली आहे.

  • कॅटेगरी           कपॅसिटी        व्हॅकंट
  • क्वारंटाईन           1199            277
  • आयसोलेशन +     8046          877
  • आयसीयू बेड्स     1092           14
  • व्हेंटिलेटर               459           32 
  • डायलिसिस            103           15 
  • नॉन कोविड          3185       2338

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या 45,854 वर पोचली असून मृतांचा आकडा 1,518 इतका झाला आहे. पालिका स्वताचे रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयातील बेड्स सह ठिकठिकाणी फिल्ड हॉस्पिटलची उभारणी करत असली तरी रुग्णांना बेड्स मिळत नसल्याच्या तक्रार वाढत होत्या. अनेक रुग्णांची बेड्स साठी 2 ते 3 दिवस वाट पाहावी लागत होती. वेळेवर उपचार मिळत नासल्याने रुग्णाची फरफट होत होती. पालीकेच्या ऑनलाइन सुविधेमुळे गरजू रुग्णांना बेड्सची माहिती एका क्लिकवर मिळणार असून त्यामुळे त्यांची फरफट थांबणार असल्याचे अपेक्षा आहे.

get update of covid and non covid hospital beds just on one click check this website

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com