मुंबईकरांनो चाललंय काय ? मुंबईतल्या दोन नंबरच्या हॉटस्पॉटमध्ये पिकनिक मूड... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईकरांनो चाललंय काय ? मुंबईतल्या दोन नंबरच्या हॉटस्पॉटमध्ये पिकनिक मूड...

महाराष्ट्रात मिशन बिगिन सुरु झालंय. मुंबईत सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. मात्र बाजार पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मात्र हाच अतिउत्साह मुंबईकरांची चिंता वाडवणारा आहे. 

मुंबईकरांनो चाललंय काय ? मुंबईतल्या दोन नंबरच्या हॉटस्पॉटमध्ये पिकनिक मूड...

मुंबई - महाराष्ट्रात मिशन बिगिन सुरु झालंय. मुंबईत सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. मात्र बाजार पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मात्र हाच अतिउत्साह मुंबईकरांची चिंता वाडवणारा आहे. 

कारण मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाचा हॉटस्पॉट असलेल्या कुर्ला भागात कोरोनाची दहशतच संपलेली आहे. नागरीक पूर्वीप्रमाणे बाजारहाट करुन सामाजिक अंतराचे भानही विसरल्याचं पाहायला मिळालं. कुर्ला परीसरात आत्तापर्यंत 2 हजार 847 कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात कुर्ला बैलबाजार जरिमरी परीसरातील रुग्णांची संख्या मोठी आहे. मात्र, तरीही या भागात कोणतेही निर्बंध नाही. सकाळपासून या भागात बाजार सुरु असतो तो रात्री पर्यंत सुरुच असतो.

मोठी बातमी - अखेर महामुंबईतील दुकाने उघडली! बाजारात उत्साह परतला...

बैल बाजारचा भाग हा झोपडपट्ट्या जुन्या चाळी असा वर्दळीचा आहे. त्यामुळे या भागात कोरोना पसरण्याची जास्त शक्यता आहे. तरीही नागरीकांकडून योग्य नियमांचे पालन होत नसल्याचे दिसत आहे. नागरीक नियमांचे पालन करत नाहीत. प्रशासकीय यंत्रणाही त्यांच्यावर वचक ठेवत नाही असा आरोप काहींकडून केला जातोय. नेहमी ज्याप्रमाणे बाजारात गर्दी असते. तशीच गर्दी आजही दिसते. या गर्दीमुळे गरजेच्या वस्तू घेण्यासाठी घराबाहेर पडण्याची हिम्मत होत नाही अशी प्रतिक्रीया येथील सूजाण नागरीक नोंदवतात.

मोठी बातमी - विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप होणार; ...'यांना' शाळेत हजर होण्याच्या सूचना

याकडे आता तरी प्रशासनाने आता गांभीर्याने पाहणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 

people in mumbais second most covid hotspot behaving like corona is no more