मिलिंद नार्वेकर यांची शिष्टाई यशस्वी, पारनेरच्या 'त्या' पाच नगरसेवकांची घरवापसी...

मिलिंद नार्वेकर यांची शिष्टाई यशस्वी, पारनेरच्या 'त्या' पाच नगरसेवकांची घरवापसी...

मुंबई - अगदी गेल्या काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश करणारे शिवसेनेचे पाच नगरसेवक आता पुन्हा शिवसेनेत जाणार आहेत. हे सर्व नगरसेवक सध्या मुंबईत आहेत. या नगरसेवकांनी आज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांची मंत्रालयत भेट घेतली. दरम्यान, याप्रकरणात शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी मध्यस्ती केली होती. या मध्यस्तीला आता यश आलेलं पाहायला मिळतंय. 

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. पारनेरच्या 5 शिवसेना नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेत बिघाडी आहे, असे प्रश्न उपस्थित केले गेले. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेतून महाविकास आघाडीतीलच राष्ट्रवादीत केलेला प्रवेश शिवसेनेला खटकला होता. याबाबतचा मेसेज शिवसेनकडून मिलिंद नार्वेकर यांच्या माध्यमातून थेट अजित पवारांपर्यंत पोहचवण्यात आला होता. दरम्यान मिलिंद नार्वेकर यांनी सातत्याने यामध्ये लक्ष घालून केलेली मध्यस्ती यशस्वी आता ठरलीये. आता या पाचही नगरसेवकांची घरवापसी होतेय. अजित पवार आणि मिलिंद नार्वेकर यांची मंत्रालयात भेट घेतल्यानंतर आता हे सर्व नगरसेवक मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत असं देखील समजतंय.  

म्हणून नगरसेवक राष्ट्रवादीत गेलेत :-  

महाविकास आघाडी ही एकसंघ आघाडी असून नगरसेवकांचे परत जाणे हा कुणाचाही विजय किंवा पराजय नाही.  ती एकपणाची खूण असल्याची प्रतिक्रीया आहे, असे दोन्ही पक्षांचे नेते सांगत आहेत. स्थानिक नेते माजी आमदार विजय औटी यांच्यावर नाराज झाल्यामुळे हे पक्षांतर झाले होते, असं लंके यांनी सांगितल्याचे समजते. दोन्ही पक्षात एकवाक्यता रहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र आहेत. मिलिंद नार्वेकर यांची शिष्टाई यशस्वी झाली.

gharwapasi of all parner shivsena corporators who recently joined NCP

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com