esakal | घाटकोपरमध्ये अपघातात दोघांचा मृत्यू | Accident
sakal

बोलून बातमी शोधा

accident

घाटकोपरमध्ये अपघातात दोघांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

घाटकोपर : वरळीतील (worli) कार्यालयातून घरी परतताना भरधाव कारचालकाने उड्डाणपुलावर (bridge) अचानक वळण घेतल्याने झालेल्या अपघातात (Accident) दोघांचा मृत्यू झाला (two people death), तर एक जण जखमी झाला. बुधवारी (ता. २९) रात्री ११ वाजता लोअर परेल येथे सेनापती बापट मार्ग येथील फिनिक्स मॉलसमोरील (phoenix mall) पुलावर अपघात झाला. दादरहून रखांगी चौकाकडे जाणाऱ्या एका कारने अचानक वळण घेतले.

हेही वाचा: मुंबईत रूग्ण वाढ राज्यात मात्र घट; महिनाभरात 10 टक्क्यांनी रूग्ण वाढ

यामुळे मोटारसायकलवरील भावेश संघवी (वय २५, रा. भटवाडी, घाटकोपर), कृष्णा कुराडकर (२६, रा. चेंबूर) यांची गाडी कारला धडकली. यानंतर त्यांची दुचाकी अनेक फूट घसरत जाऊन पुढे अजून एका दुचाकीला धडकली. त्यांना उपचारासाठी नायर रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी भावेशला मृत घोषित केले. कृष्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसऱ्या मोटारसायकलवरील अश्फाक मुलतानी जखमी झाला.

यातील दोषी कारचालक दादरकडे पळून गेला. पोलिसांना त्याच्या कारचा नंबर मिळालेला नाही. या प्रकरणी एनएम जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीच्या साह्याने कारचालकाचा शोध सुरू आहे. अपघातात मृत्यू पावलेले दोन्ही तरुण कामावरून वरळीहून घरी परत येत होते. यातील कृष्णाला दीड वर्षाची मुलगी आहे. भावेशचेही नुकतेच लग्न झाले. पोलिसांनी आरोपी अमित कुमार (३०) याला अटक केली.

loading image
go to top