पोलीस गणवेशातील फोटो अन् बनावट नेमप्लेट, घाटकोपरमध्ये बनावट PSIचा पर्दाफाश; पोलिसांनाच दाखवत होता अधिकाराचा धाक

Ghtkopar Crime News: मुंबईतील घाटकोपरमध्ये बनावट पोलीस उपनिरीक्षकाचा पर्दाफाश झाला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Ghatkopar Fake PSI exposed

Ghatkopar Fake PSI exposed

ESakal

Updated on: 

मुंबई : आपण पोलीस अधिकारी असल्याचे सांगून सर्वसामान्य नागरिकांवर आणि चक्क पोलिसांवरच रुबाब दाखवणाऱ्या एका तरुणाला घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. वैभव दीपक नारकर (वय ३३) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. आपण २०१५ च्या बॅचचा पोलीस उपनिरीक्षक (PSI) असल्याचा दावा तो करत होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याचा बनावटपणा समोर आला.

Loading content, please wait...