esakal | मुंबईच्या 7 खासगी रुग्णालयातील कोविड वॉर्ड हाऊसफुल
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईच्या 7 खासगी रुग्णालयातील कोविड वॉर्ड हाऊसफुल

बॉम्बे, भाटीया, जसलोक, ब्रीच कँडी, सैफी, वोक्हार्ड आणि ग्लोबल रुग्णालयातील जनरल वॉर्ड आणि आयसीयू सध्या हाऊसफुल झाले असून प्रत्येक रुग्णालयात किमान 30 ते 70 रुग्ण प्रतिक्षा यादीत आहेत. 

मुंबईच्या 7 खासगी रुग्णालयातील कोविड वॉर्ड हाऊसफुल

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: दक्षिण मुंबईतील 7 प्रसिद्ध आणि खासगी रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांसाठी बेड्स उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. बॉम्बे, भाटीया, जसलोक, ब्रीच कँडी, सैफी, वोक्हार्ड आणि ग्लोबल रुग्णालयातील जनरल वॉर्ड आणि आयसीयू सध्या हाऊसफुल झाले असून प्रत्येक रुग्णालयात किमान 30 ते 70 रुग्ण प्रतिक्षा यादीत आहेत. 

गेल्या महिन्याभरात वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे हा परिणाम झाला असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शुक्रवारी बॉम्बे, भाटीया, जसलोक, ब्रीच कँडी, सैफी, वोक्हार्ड आणि ग्लोबल रुग्णालयात एक ही आयसीयू आणि जनरल वॉर्डमधील बेड रिक्त नसल्याचे समोर आले. 

पालिकेच्या वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दक्षिण मुंबईतील लोक जंबो कोविड सेंटरमध्ये आणि मोठ्या सार्वजनिक रुग्णालयात जसे की, सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालयात दाखल होऊन उपचार घ्यायला तयार नाहीत.

अधिक वाचाः  मुंबईत कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव,  दोन हजार नवीन रुग्णांची भर

 
दुसऱ्या एका पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गणेशोत्सवानंतर कोविडच्या केसेसमध्ये वाढ झाली असून मृत्यू दरात ही वाढ झाली आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यामुळे एकूण शहरातील रुग्णालयातील बेड्सचा तुटवडा जाणवू लागला आहे. गेल्या 11 दिवसांत म्हणजेच सप्टेंबर 20 ते 1 ऑक्टोबरदरम्यान शहरात  25 हजार 396 केसेस आढळलेत. दरदिवशी 2300 या दराने रुग्णसंख्या वाढत आहे. दक्षिण मुंबईत रुग्णांची संख्या वाढायला लागली असून डी वॉर्डमधील ब्रीच कँडी, पेडर रोड आणि मलबार हिल या परिसरातून गेल्या शनिवारी 135 केसेसची नोंद झाली. तर, 133 रविवारी आणि सोमवारी 144 केसेस नव्याने आढळले. 

वरळीच्या एका हाऊसिंग सोसायटीमध्ये आतापर्यंत 49 केसेस समोर आल्या असून त्यातील 28 सक्रिय रुग्ण आहेत आणि दोघांचा मृत्यू ही झाला आहे. 

अधिक वाचाः  महाराष्ट्रातल्या गुन्हेगारी संदर्भातली आकडेवारी समोर, NCRB ची माहिती

मरिन लाईन्स येथील बॉम्बे रुग्णालयात 86 कोविड 19 बेड्स आहेत. त्यात 40 आयसीयू बेड्स आहेत. पण, यापैकी शुक्रवारी एक ही बेड रिक्त नव्हता. तर, 60 जण प्रतिक्षा यादीत असून आम्ही रुग्णांना उपनगरातील रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत असल्याचे एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितले आहे. 
 
लवकरच कोविड 19 च्या रुग्णांसाठी 25 बेड्सची सुविधा केली जाणार आहे. शिवाय, कोविड 19 चे बेड्स उपलब्ध व्हावे म्हणून  इतर खासगी रुग्णालयांशीही बोलणे सुरू आहे आणि रुग्णांना आवाहन करत आहोत की, त्यांनी जंम्बो कोविड सेंटरमध्ये जाऊन उपचार घ्यावे जास्त वेळ वाया घालवू नये. 

डॉ. गौतम भन्साली, सल्लागार फिजीशियन आणि विविध रुग्णालयाचे मुख्य समन्वयक

रुग्णालय आयसीयू  बेड्स कोविड 19 बेड्स प्रतिक्षा यादी (आयसीयू) 
       
ब्रीच कँडी  09    45 30
भाटीया  23  80 50
जसलोक  20  28  20
सैफी  26 97  30
वोक्हार्ड 128 30   12 


भाटिया रूग्णालयाचे मुख्य इंटिरिझिस्ट डॉ. गुंजन चंचलानी म्हणाल्या की, गेल्या तीन आठवड्यात प्रतिक्षा यादी 10 पासून 50 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. जे रुग्ण आता दाखल झाले आहेत त्या सर्वांच्या फुप्फुसावर परिणाम झालेला आहे. आणि त्यातले बरेचसे 40 वर्षांखालील आहेत.

---------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Increased patients Covid ward housefull 7 private hospitals in Mumbai

loading image
go to top