

Ghatkopar Landslide Youth died before his birthday
ESakal
मुंबई : नेटवर्क मिळत नसल्याने डोंगरावरील घरात गेलेल्या ३० वर्षीय विकीत यादवचा वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच मृत्यू झाला. विकीत एका कंपनीत नोकरी करीत होता. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी तो कामानंतर रात्री वितरणाचे कामही करायचा. त्याचा भाऊ रोहित (२१) आणि योगेश (२४) हेही काम करून कुटुंबाला हातभार लावतात. दिवसभर काम केल्यानंतर घटनेच्या रात्री विकीत घरी आला. तो प्रचंड थकलेला होता. 'मी थकलो आहे, घरात जाऊन आराम करतो,' असे सांगून तो घरात गेला; मात्र त्यानंतर तो पुन्हा बाहेर आलाच नाही.