

Ghatkopar Metro bridge cracks
ESakal
मुलुंड : काही दिवसांपूर्वी मुंबईतील मुलुंड येथे मेट्रो प्रकल्पाच्या कामादरम्यान स्लॅब कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली असून नागरिकांकडून एमएमआरडीएच्या कामावर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच मुंबईसह उपनगरात सुरु असलेल्या मेट्रो प्रकल्पाची पाहणी करावी, अशी मागणी देखील केली जात होती. असे असतानाच घाटकोपर येथे मेट्रो ब्रिजला तडा गेल्याची ,माहिती समोर आली आहे.