मुंबई : घाटकोपर येथील पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात एकाच दिवशी तीन अर्भकांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चौकशीची मागणी केली..रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, एका महिलेच्या बाळाचा गर्भातच मृत्यू झाला होता. संबंधित महिला उच्च रक्तदाब आणि मधुमेहाने त्रस्त असल्याचे सांगण्यात आले. अन्य एका प्रकरणात उपचारादरम्यान काही अडचणी आल्याचे सांगण्यात आले. .Mumbai News: मुंबईत कोट्यवधींचं घर विकलं अन् घेतली बाईक! कारण काय? स्टार्टअप फाउंडरने सांगितली धक्कादायक निर्णयामागची कहाणी.याप्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारती राजुलवाला यांची भेट घेत माहिती जाणून घेतली. रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा, उपकरणे, मनुष्यबळ आणि प्रसूती व्यवस्थेची पाहणी करण्याची मागणी करण्यात आली..दरम्यान, तीन नवजात शिशूंच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप माहिती समोर आली नाही. या प्रकरणी चौकशी सुरू असून या घटनेमुळे रूग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे..Mumbai News: सी लिंकला 'तारीख पे तारीख'! 'वांद्रे-वर्सोवा'साठी चार टप्प्यांत १,४२१ दिवसांची मुदतवाढ.राजवाडी रुग्णालयातील तीन अर्भकांचा मृत्यूप्रकरणी, उपनगरीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार आणि रुग्णालयाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती राजुलवाला यांच्याकडून माहिती घेण्यात आली आहे. तसेत त्यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून या नवजात शिशूंच्या मृत्यूचे कारण लवकरच समोर येईल, अशी माहिती भांदिर्गे यांनी दिली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.