'या' सुविधांमध्ये घाटकोपर "एन' विभाग अव्वल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

मुंबई : घाटकोपर, पश्‍चिम येथील आझाद नगर सुविधा केंद्र आणि घाटकोपर (पूर्व) द्रुतगती महामार्गावरील घाटकोपर पम्पिंग येथील हायवे सुविधा केंद्र यांनी "सर्वोत्कृष्ट शौचालय सुविधे'साठी अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे एन विभागाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.

आजची महत्वाची बातमी काँग्रेसचे अंडरवर्ल्डशी संबंध होते का ? सोनिया गांधी उत्तर द्या..

पालिकेच्या स्वच्छ भारत अभियान मध्यवर्ती यंत्रणेमार्फत "युनायटेड वे मुंबई' या संस्थेला मुंबईमधील स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबींचा सर्व्हे करून त्याची गुणवंता व रॅकिंग ठरविण्याबाबत काम देण्यात आले होते. घाटकोपर (पश्‍चिम) येथील आझाद नगर सुविधा केंद्रामध्ये 32आसनी सामुदायिक शौचालय बांधण्यात आले आहे. तर घाटकोपर (पूर्व) द्रुतगती महामार्गावरील घाटकोपर पम्पिंग येथील हायवे सुविधामध्ये "पैसे द्या व वापरा' या तत्वावर 12 आसनी सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले आहे.

ही बातमी वाचलीये का... मटणाचा झाला भडका; पाहा नेमकं काय घडलं!

पुरस्कार मिळालेल्या शौचालयांमध्ये आंघोळीची सुविधा, पाण्याचा पुनर्वापर आणि पर्जन्य जलसंचयनची सुविधा, लहान बाळांकरिता स्तनपान खोली, अभ्यासिका, शौचालयाची सुविधा व मुतारी इत्यादी सुविधा उपलब्ध असून आधुनिक पद्धतीनेही शौचालये बांधण्यात आलेली आहेत. शौचालयांमध्ये उच्च दर्जाची स्वच्छता, आधुनिक पद्धतीचे बांधकाम आणि स्वच्छता सर्वेक्षण - 2020 च्या अनुषंगाने सर्व बाबींची पूर्तता असल्याने या विभागाला प्रथम पारितोषिकाचा मान मिळाला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ghatkopar "N" Division top in these facilities