घाटकोपर येथे मालकिणीला ब्लॅकमेल करत अत्याचाराची घटना, पोलिसांकडून आरोपीला अटक

घाटकोपर येथे मालकिणीला ब्लॅकमेल करत अत्याचाराची घटना, पोलिसांकडून आरोपीला अटक

मुंबई : घाटकोपर येथे नोकरानेच घरच्या मालकिणीला ब्लॅकमेल करत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नोकराने ऐवढ्यावरच न थांबता मालकिणीला तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर वायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून लाखोंचे दागिने घेतले. नेहमीच्या त्रासाला कंटाळून अखेर मालकिनीने पंतनगर पोलिसठाण्यात धाव घेतल्यानंतर हा सर्व प्रकार उघकीस आला आहे.

मूळचा उत्तर प्रदेशचा राहणारा २१ वर्षीय आरोपी रामजीयावन भवानी प्रसाद वर्मा हा मुंब्रा परिसरात राहतो. घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे तो नोकरीच्या शोधात होता. रामजीयावन हा पीडित महिलेच्या गावचाच होती. त्याची घरची परिस्थीती पाहून तक्रारदार महिलेने नवऱ्याला सांगून त्याला त्यांच्याकडेच कामाला ठेवले. काही दिवस राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे तो तक्रारदार महिलेकडेच रहात होता. मात्र उपकाराची जाणीव नसलेल्या रामजीयावनची त्याच्या मालकिणीवर वाईट नजर होती. ऐके दिवशी मालक घरी नसल्याचे पाहून रामजीयावनने मालकिणीवर जबरदस्ती केली. मालकिणीने आरडा ओरडा केला असता त्याने तिला आणि तिच्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याने त्याच्या मोबाइलवर मालकिणीचा अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढून त्या फोटोच्या आधारे तो मालकिणीला धमकावत  होता.

त्याने अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर वायरल करण्याची धमकी देऊन अनेकदा तक्रारदार महिलेच्या घरी आणि घाटकोपर येथील एका ठिकाणी बोलावून अत्याचार केले. ऐवढ्यावरच न थांबता कालांतराने त्याने मालकिणीकडे पैशांची मागणी सुरू केली. पैसे देता येत नसल्यामुळे त्याने मालकिनीचे 8 ग्रॅम वजनाचे कर्णफुल, सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम 1 लाख 20 हजार रुपये उकळले. मात्र दिवसेंदिवस रामजीयावनच्या मागण्या वाढतच होत्या, रोजच्या या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने पंतनगर पोलिसात धाव घेत रामजीयावन विरोधात तक्रार नोंदवली. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी रामजीयावन वर्मा विरोधात 376 (एन), 386, 323, 504 (2), 506  भा.द.वि कलमांतर्गत गुन्हा नोंदवला असून त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 

ghatkopar police caught man who was house worker as well for blackmailing women of the house

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com