esakal | शिस्त पाळा, अन्यथा कारवाई! वाहतूक पोलिसांच्या रिक्षाचालकांना सूचना | Traffic police
sakal

बोलून बातमी शोधा

traffic police

शिस्त पाळा, अन्यथा कारवाई! वाहतूक पोलिसांच्या रिक्षाचालकांना सूचना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

घाटकोपर : ‘घाटकोपरमध्ये (Ghatkopar) रिक्षांचा अडथळा’ या शीर्षकाखाली ‘सकाळ’मध्ये २४ सप्टेंबर रोजी बातमी (sakal news) प्रसिद्ध झाल्यावर त्याची दखल घेत वाहतूक विभागाचे (traffic police) वरिष्ठ पोलिस निरीक्षक नागराज मजगे (Nagraj majge) यांनी आज रिक्षाचालकांना सूचना केल्या. यावेळी शिस्त पाळा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा सज्जड दम दिला.

हेही वाचा: उत्तराखंड हिमस्खलन दुर्घटना; मुंबईकरांचे मृतदेह सापडले

घाटकोपरमध्ये रिक्षाचालकांच्या बेशिस्तपणामुळे प्रवाशांना नेहमी त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच काही बेशिस्त व अनधिकृत रिक्षाचालक रेल्वेस्थानक रोडवर प्रवासी भरण्यासाठी रिक्षा उभ्या करत असल्याने प्रवाशांना व इतर वाहनांना अडचण होत असल्याच्या अनेक तक्रारी वाढल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर घाटकोपरमध्ये रिक्षाचालकांच्या बेशिस्तपणाचा प्रवाशांना अडथळा कसा होतो यावर प्रकाश टाकण्यात आला. या मुद्द्यांवर आज वरिष्ठ पोलिसांची चर्चा करण्यात आली. यात रिक्षा थांब्यांबाबत युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून रिक्षाचालकांच्या समस्याही पोलिसांनी जाणून घेतल्या.


"स्थानक मार्ग मोकळा कसा होईल व शेअर रिक्षा थांबे अन्य ठिकाणी कसे वळवता येतील, यावर विशेष बैठक घेऊन मार्ग काढता येईल. मात्र त्याआधी अनधिकृत रिक्षाचालकांवर कारवाई आम्ही सुरू करीत आहोत. बेशिस्त वागणाऱ्या रिक्षाचालकांनी शिस्त न पाळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल."

- नागराज मजगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक


"आम्ही नेहमी रिक्षा रांगेत लावत असतो, मात्र काही बेशिस्त रिक्षाचालकांचा आम्हाला त्रास होतो. काही रिक्षाचालक नियम मोडून तीन प्रवासी घेऊन जातात. मनमानी व्यवसाय करतात. त्याचा आम्हाला फटका बसतो. अशा रिक्षाचालकांवर सतत कारवाई झाल्यास ते शिस्तीवर येतील.
- राजेश हांडे, रिक्षाचालक."

"मेट्रो खांब आणि काही फेरीवाल्यांमुळे आम्हाला प्रवासी भाडे घेताना अडचण होते. फेरीवाले रस्ता अडवून बसतात. रिक्षा उभी करायला जागा राहत नाही. स्थानकाबाहेरील फेरीवाले बंद केले तर मार्ग मोकळा होईल. रिक्षाचालकांना रिक्षा उभ्या करण्यास अडथळा येणार नाही."
- कैलास मोरे, रिक्षाचालक.

loading image
go to top