घाटकोपरमध्ये पांढऱ्या पट्टीच्या वादावर पडदा, रंगाच्या पट्ट्या मारत काढला तोडगा

Ghatkopar News घाटकोपरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पांढऱ्या रंगाच्या पट्टीवरून निर्माण झालेला वाद अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने मिटला आहे. हा वाद मिटल्याची माहिती प्रसाद वेदपाठक यांनी समाजमाध्यमाद्वारे माहिती दिली आहे.
Mumbai Row Ends With Unique Colour Stripe Solution

Mumbai Row Ends With Unique Colour Stripe Solution

Esakal

Updated on

मुंबई, ता. १० घाटकोपर पूर्वेतील कैलास अव्हेन्यू सोसायटीत गेल्या काही दिवसांपासून पांढऱ्या रंगाच्या पट्टीवरून निर्माण झालेला वाद अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने मिटला आहे. पांढऱ्या पट्टीवर लाल आणि पिवळ्या रंगाची पट्टी मारून तडजोडीचा मार्ग काढण्यात आला असून, हा वाद संपल्याचे प्रसाद वेदपाठक यांनी जाहीर केले आहे. या सोसायटीतील रहिवासी प्रसाद वेदपाठक यांनी इमारतीसमोरील रस्त्यावर काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीबाबत आक्षेप नोंदवला होता. त्यांनी समाजमाध्यमावर पोस्ट केलेल्या व्हिडिओनंतर सोसायटीतील रहिवाशांमध्ये मतभेद निर्माण होऊन त्याला धार्मिक वादाचे स्वरूप प्राप्त झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com