Thane Road Safety: घोडबंदर रस्त्यावर पाण्याच्या फवारणीमुळे चिखलाचे साम्राज्य

घोडबंदर रस्त्यावरील रुंदीकरण कामांदरम्यान धूळ नियंत्रणासाठी होणाऱ्या पाण्याच्या फवारणीमुळे रस्ता चिखलमय; दुचाकीस्वारांच्या अपघाताचा धोका वाढल्याने वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये संताप
Civic Nightmare: Improper Water Sprinkling Turns Ghodbunder Road into a Muddy Trap

Civic Nightmare: Improper Water Sprinkling Turns Ghodbunder Road into a Muddy Trap

Sakal

Updated on

ठाणे : ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावरून प्रवस करताना, आधीच वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अशातच आता वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या नागरिकांच्या अडचणीत आता आणखी भर पडली आहे. रस्ते बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराकडून सुरू असलेल्या पाण्याच्या फवारणीमुळे अनेक ठिकाणी रस्ते चिखलमय झाले असून त्यामुळे दुचाकीस्वारांच्या अपघाताचा धोका वाढला आहे. वाहतूक सुरू असतानाच ही फवारणी केली जात असल्याने वाहनचालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com