
Ghodbunder Traffic Jam
ESakal
ठाणे शहर : घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट भागाचे डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आल्यामुळे, हा घाट रस्ता चार दिवसांसाठी अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंद ठेवला आहे. शनिवारी (ता. ११) रात्री १० वाजल्यापासून मंगळवारी (ता. १४) रात्री १२ वाजेपर्यंत या मार्गाने अवजड वाहनांना वाहतूक करता येणार नाही. यामुळे या मार्गावरील वाहतूक अंजूरफाटा मार्गे वळवली आहे.